घरमनोरंजनहिंदूंच्या भावना दुखवल्यामुळे 'तांडव' वेबसीरिज बंद करण्याची मागणी

हिंदूंच्या भावना दुखवल्यामुळे ‘तांडव’ वेबसीरिज बंद करण्याची मागणी

Subscribe

ट्विटरवर सुरु आहे #BanTandavNow चा ट्रेंड

बॉलिवूडमधील बहुचर्चित ‘तांडव’ वेबसिरिज नुकतीच प्रदर्शित झाली. परंतु ही वेबसिरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. Amazone प्राईमवर रिलीज झालेली या वेबसिरिजला सध्या सोशल मिडियावर बरचं ट्रोल केले जात आहे. हिंदूंच्या देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप या वेब सीरिजवर ठेवण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार सिरीजमधील एका सीनमुळे घडला आहे. या सीनमध्ये बॉलिवूड अभिनेता मोहम्मद जीशान अयूब स्टेडवर भगवान शंकरांची भूमिका करत आहेत. अशावेळी आणखी एक व्यक्ती स्टेजवर येते. त्यानंतरचं सगळं स्किट हे JNU शी जोडलं गेलं आहे. याचदरम्यान भगवान शंकरांची भूमिका करत असलेला अभिनेता जीशान अयूबने शिवी देतो. त्यामुळे या सिरिजवर चारही बाजूंनी टीकेची झोड उठवली जात आहे. या व्हिडिओवरून चाहत्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. हिंदू संघटना देखील या व्हिडिओमुळे नाराज आहे.
या वेबसिरिजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, तिग्मांशु धूलिया, सुनिल ग्रोवर यांसारखी बडी स्टारकास्ट आहे. ही वेबसिरिज Amazon Prime वर रिलीज करण्यात आली आहे. रिलीज होताच अनेकांनी या वेबसिरिजवर आपले मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काहींना ही वेबसिरिज पसंतीस उतरली तर काहींना यावर तीव्र रोष व्यक्त केला. हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप ठेवत, रविवारपासून ट्विटरवर तांडव बॉयकट, तांडवा सिरिजचे प्रदर्शन बंद करा अशी मागणी केली जात आहे. ट्विटरवर #BanTandavNow ट्रेंड सुरु झाला आहे. तांडव सिरिज अभिनेता जीशन अयबूसह निर्मात्याला ट्विटरवर बरचं ट्रोल केलं जात असून निर्मात्याने माफी मागावी अशी मागणी हिंदू संघटना करत आहेत. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लोकं जाणूनबुजून हिंदू देवता हिंदू संस्कृतीला लक्ष करतात असे युझर्सचे मत आहे. या वेबसिरिजवर हिंदू देवतांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत हायकोर्टाचे वकील आशुतोष दुबे यांनी Amazon Prime व्हिडिओ आणि अली अब्बास जफर यांनी अधिकृत नोटीस पाठवली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा- Video: सीरमच्या अदर पुनावाला यांनी टोचून घेतली लस

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -