सर्वांनी आदर्श घ्यावा असे आदेश बांदेकरांच्या बाप्पाचं अनोखं विसर्जन

मराठी टेलिव्हिजनवरील मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भाऊजी. वारंवार विविध कारणांमुळे चर्चेत असतात.कधी नाटकांतून तर कधी चित्रपट आणि मालिकांमधून आदेश बांदेकरांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

आदेश बांदेकर यांचे मनोरंजन क्षेत्रासोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही मोठे योगदान आहे. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. दरम्यान, आदेश बांदेकर यांच्या घरी देखील नेहमीप्रमाणे बाप्पाचे आगमन झाले होते. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी त्यांच्या गणपतीचे विसर्जन झाले. गणपती विसर्जनाचा एक खास व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

सध्या आदेश बांदेकरांचा हा आगळावेगळा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. खरंतर सध्या जल प्रदूषणामुळे गणपती विसर्जनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सर्वत्र कृत्रिम तलावांची उभारणी करून त्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्याकडे भर दिला जात आहे. तर अनेकजण घरच्या घरी विसर्जन करत आहेत.आपल्या घरच्या बाप्पाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप देणारा असाच एक खास विडिओ आदेश बांदेकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरुन शेअर केला आहे.

प्रत्येकाने आदर्श घ्यावा असे विसर्जन आदेश बांदेकरांनी केलेले या व्हिडिओ मधून दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बाप्पाची मूर्ती तिच्या स्थानापासून आपोआप वरती जाते मग त्या मूर्तीला एका सुंदर फुलांनी सजवलेल्या देवघरासारख्या जागेत ठेवलं जातं आणि त्यांनतर आपोआप एका बॉक्समध्ये बंद होते. अशा पद्धतीने आदेश बांदेकरांच्या घरचा गणपती पाण्यात विसर्जित होतो. घरच्या घरी पण अनोख्या पद्धतीचे हे विसर्जन सर्वांसाठी आदर्श ठरत आहे.