घरमनोरंजन‘बंदिश बॅन्डिटस’ प्रदर्शनासाठी सज्ज

‘बंदिश बॅन्डिटस’ प्रदर्शनासाठी सज्ज

Subscribe

नव्या तांत्रिक माध्यमाने प्रेक्षकांना पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलेले आहे. एखादा आवडीचा कार्यक्रम पहायचा झाला तर त्यासाठी अगदी टीव्हीसमोर मांडी घालून बसण्याची गरज नाही. वेगवेगळ्या अ‍ॅपने ही मनोरंजनाची गरज आपापल्या पद्धतीने भागवलेली आहे. ‘अ‍ॅमेझॉन प्राईम व्हीडिओ’ने सर्वच प्रकारचे कार्यक्रम या अ‍ॅपच्या माध्यमातून देणे सुरू केलेले आहे. लवकरच ‘बंदिश बॅन्डिट्स’ ही नवीन सीरिज प्रदर्शनासाठी सज्ज झालेली आहे. संगीतमय प्रेमकहानी यात पहायला मिळणार आहे. आनंद तिवारी हे या सीरिजचे दिग्दर्शक आहेत.

फक्त नव्या कार्यक्रमांची घोषणा करून चालत नाही तर प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सेलिब्रिटींचे योगदान यासाठी महत्त्वाचे असते. सीरिजची कथा ही संगीताशी जोडलेली आहे म्हटल्यानंतर आनंदने शंकर-एहसान-लॉय यांना या सीरिजसाठी एकत्र आणलेले आहे आणि व्हिडिओ स्ट्रिमिंग मंचासाठी ते प्रथमच काम करणार आहेत. कथेचा नायक हा भारतीय शास्त्रीय संगीताचा मोठा चाहता आहे. शिवाय तो निष्णात गायकही आहे. त्याच्या निमित्ताने नावीन्यपूर्ण गाणी या सीरिजमध्ये ऐकायला आणि पहायला मिळतील. अन्य भाषेतही या सीरिजची निर्मिती करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -