देशभरात सध्या गणेश चतुर्थीची जोरदार तयारी सुरु आहे. 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनाची बॉलिवूड कलाकार देखील जोरदार तयारी करताना दिसून येतात. अशातच, प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी देखील अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन
शिल्पा शेट्टी दरवर्षी गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करते आणि गणेश चतुर्थीच्या एक-दोन दिवस आधी बाप्पाला घरी आणते. चतुर्थीच्या सकाळी तिच्या घरी बाप्पाची स्थापना केली जाते. अशातच, रविवारी संध्याकाळी शिल्पाने पती राजसोबत गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणली. यावेळचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लालबागमधून घेतली शिल्पाने बाप्पाची मूर्ती
शिल्पा मुंबईतील लालबाग येथून गणपतीची इको-फ्रेंडली मूर्ती घरी आणते. यावेळी शिल्पाचे 13वे वर्ष आहे. जवळपास दीड दिवस शिल्पा बाप्पाला घरात ठेवते. शिल्पा शेट्टी दरवर्षी आपल्या कुटुंबियांसोबत गणेशोत्सव साजरा करते. दरवर्षी अभिनेत्री आपल्या कुटुंबियांसोबत गणेश स्थापनेची जुनी परंपरा करते. शिल्पा शेट्टी कुंद्रा 2010 पासून गणेशजींचा हा उत्सव साजरा करत आहे. वृत्तानुसार, 13 वर्षांपूर्वी शेट्टी यांनी प्रत्येक चतुर्थीला प्रार्थना पूर्ण केल्यानंतर गणेश घरी आणण्याचे व्रत केले होते, त्यानंतर ही परंपरा सुरू आहे.