घरमनोरंजन'किसी का भाई किसी की जान'मधील 'बठुकम्मा' गाणं रिलीज

‘किसी का भाई किसी की जान’मधील ‘बठुकम्मा’ गाणं रिलीज

Subscribe

सुपरस्टार सलमान खानने आपला आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ मधील ‘बठुकम्मा’हे नवे गाणे रिलीज केले आहे. ‘बठुकम्मा’हा एक वार्षिक फ्लॉवर फेस्टिव्हल आहे जो तेलंगणातील महिलांद्वारे नऊ दिवस साजरा केला जातो. सलमानच्या चित्रपटातील या नवीन गाण्याचे नाव या उत्सवावरून ठेवण्यात आले आहे. तसेच, या गाण्यात सलमान खानला पारंपारिक तेलुगू पोशाखात पाहायला मिळते.

हे गाणे सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे आणि यामध्ये पारंपारिक आणि मॉडर्न संगीत दोन्ही आहे, ज्यामध्ये पूजा हेगडेला सुंदर नृत्य करताना पाहायला मिळेल. दरम्यान, गाण्यातील वायब्रेंट आणि कलरफुल सेटअप, पारंपारिक तेलुगु पोशाख आणि 200 बॅकग्राउंड डांसर गाण्याला एक अनोखा स्पर्श देतात. तसेच, हे गाणे बठुकम्मा उत्सवादरम्यान चित्रित करण्यात आले होते. सलमान खानचे चित्रपट आणि त्याची गाणी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. अशातच, ‘बठुकम्मा’हे गाणे लाँच करत सलमान खान आणि ‘किसी का भाई किसी की जान’च्या टीमने तेलुगू संस्कृतीप्रति उत्साही लोकांना एक सुंदर भेट दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

- Advertisement -

‘बठुकम्मा’चे संगीत रवी बसरूर यांनी दिले आहे. तसेच, संतोष वेंकी, ऐरा उडुपी, हरिनी इवातुरी, सुचेता बसरूर, विजयलक्ष्मी मेट्टिनाहोल यांनी गाण्याला आवाज दिला असून, गाण्याचे बोल शब्बीर अहमद, रवी बसरूर, किन्नल राज आणि हरिनी इवातुरी यांनी लिहिले आहेत.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

ग्लोबल स्पाय सिरीज ‘सिटाडेल’चा नवीन ट्रेलर प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -