घरमनोरंजनकरणबरोबर कॉफी पिण्यासाठी पुन्हा व्हा तयार

करणबरोबर कॉफी पिण्यासाठी पुन्हा व्हा तयार

Subscribe

'२१ ऑक्टोबर रोजी प्रिमियर, रविवार रात्री ९ वा.' असं ट्विट करत करण जोहरनं लवकरच येत असल्याचं सांगितलं आहे.

करण जोहर पुन्हा एकदा आपला सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’चा पुढचा सीझन घेऊन येत आहे. २१ ऑक्टोबरला या शो चा प्रिमियर येत आहे. शनिवारी ट्विट करून याबद्दल करणनं माहिती दिली आहे. करणनं कॉफी कपाच्या इमोजीसह ‘ही वेळ आहे कॉफी उचलून त्याचा सुवास घ्यायचा. येत आहे…’ अशी कॅप्शन देत सांगितले. तर दुसऱ्या फोटोमध्ये, ‘२१ ऑक्टोबर रोजी प्रिमियर, रविवार रात्री ९ वा.’ असं म्हटलं आहे. दरम्यान तिसऱ्या फोटोमध्ये सहाव्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून त्याचा फोटो पोस्ट केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सीझनमध्ये कपाचा रंग हा पिवळा बदलून काळा करण्यात आल्याचं दिसत आहे.

‘कॉफी विथ करण’चा सहावा सीझन

आतापर्यंत ‘कॉफी विथ करण’चे पाच सीझन येऊन गेले आहेत. करण नेहमीच बॉलीवूडमधील वेगवेगळ्या स्टार्सच्या मुलाखत या शो मध्ये करण घेत असतो. इतकंच नाही तर या स्टार्सच्या व्यक्तीगत आयुष्यात काय चालू आहे याबाबतही या शो मध्ये चर्चा असते. यावेळी या सीझनमध्ये नक्की कोणते स्टार्स येणार याचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

- Advertisement -

पहिल्या भागात नक्की कोण येणार?

या शोच्या पहिल्याच भागात कोण गेस्ट येणार या चर्चेला सुरुवात झाली आहे. तर सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेले नवे स्टार्स जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या भागातील पहिले गेस्ट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘बॉलीवूड लाईफ’ या वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार, करणच्या शो मध्ये पहिल्या भागातच ही जोडी दिसणार आहे. करण जोहरनं निर्मिती केलेला ‘धडक’ हा चित्रपट १०० कोटीच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. यासंदर्भात करणनं ट्विटदेखील केलं होतं.

- Advertisement -

करणचा शो मधील वेगळा अंदाज

या शो मध्ये नेहमीच करण आपल्या आलेल्या पाहुण्यांना अतिशय व्यक्तिगत आणि व्यावसायिक प्रश्नदेखील विचारत असतो. हा शो यशस्वी होण्याचा हाच एक मूळ अंदाज आहे. त्यामुळं यावेळी जान्हवी आणि ईशानला करण गुगली टाकणार की, हे दोन नवे स्टार्स करणला बोल्ड करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -