मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या सुष्मिताने चाहत्यांची प्रचंड मनंही जिंकली आहेत. सुष्मिता सेनने 1994 मध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. ती नेहमीच लाईम लाइट मध्ये असते. तिनं केवळ आपल्या अभिनयानचं नव्हे तिच्या प्रेमळ स्वभावामुळे लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
सुष्मिता सेन ‘मिस युनिव्हर्स’ बनणारी पहिली भारतीय महिला होती. आज २१ मे हा दिवस सुष्मिताच्या आयुष्यातील एक खास दिवस आहे. कारण २९ वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला सुष्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता. २१ मे १९९४ रोजी मनिला येथे सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला होता. या खास दिवसानिमित्त सुष्मिताने एक जुना फोटो शेअर करत एक खास नोट लिहिली आहे.

21 मे 1994 रोजी सुष्मिता सेनने भारतासाठी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून इतिहास रचला. तसेच 42 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत 77 देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता, पण सुष्मिता सेन ‘मिस युनिव्हर्स’ची मुकुटाची मालकिन बनली होती. फिलिपाइन्समध्ये झालेल्या ४३व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची सुष्मिता विजेती होती. हा विजय देखील मोठा होता कारण सुष्मिता ही हे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय होती.
आज या घटनेला म्हणजेच 20 मे ला 29 वर्षे पूर्ण झाली. सुष्मिता सेनने सुमारे तीन दशकांपूर्वीचा स्वतःचा एक मोनोक्रोम फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो क्लोजअप असून याध्ये सुष्मिता चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला हात ठेवून कॅमेराकडे पाहत आहे. सुष्मिताने फोटोसोबत एक मोठी पोस्ट देखील लिहिली आहे.
तसेच तिने यात आपला आनंद व्यक्त करत म्हंटल की, आपल्या मातृभूमीचे प्रतिनिधित्व केले आहे ही आपल्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. आजही माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आहेत. महत्वाचे म्हणजे मिस युनिव्हर्स जिंकल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर ती बॉलिवूडकडे वळली. अशातच आज ती एका मोठ्या शिखरावर आहे.
- Advertisement -
हेही वाचा :
- Advertisement -
- Advertisement -