या व्यक्तीमुळे ‘शोले’तील गब्बरचे संवाद झाले अजरामर

गब्बर

बॉलिवूडमध्ये 1975 साली प्रदर्शित झालेला ‘शोले’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. अनेकजण वारंवार हा चित्रपट पाहणं पसंत करतात. या चित्रपटातील सर्वच कलाकारंचा अभिनय, डायलॉग, अॅक्शन, गाणी सारं काही उत्तम होतं. याचं चित्रपटातील गब्बर हे पात्र देखील प्रचंड गाजलं. गब्बरचे डायलॉगही आजही अनेकांच्या तोंडी असतात. यामध्ये गब्बरचा “यहां से पचास-पचास कोस दूर गांव में जब बच्चा रात को रोता है, तो मां कहती है बेटा सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा…” आणि “कितने आदमी थे” हे देखील आहेत.

परंतु तुम्हाला माहित आहे का? गब्बरच्या पात्रासाठी चित्रपटामध्ये वापरण्यात आलेला गब्बरचा अंदाज गब्बरला कोणी सांगितला होता? मुळात चित्रपटातील गब्बरचा देशी अंदाज त्याला कोणत्याही लेखकाने सांगितला नव्हता तसेच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने देखील सांगितला नव्हता. खरंतर हे डायलॉग बोलण्याचं कौशल्य गब्बरची भूमिका साकारणारा अभिनेता अमजद खान त्याच्या गावामधील एका धोब्याकडून शिकला होता. त्याच्या गावातील धोबी रोज सकाळी लोकांशी याच अंदाजात बोलायचा. अमजद खान धोब्याच्या या स्टाईलवर प्रभावित झाला आणि हेच कौशल्य त्याने शोले चित्रपटामध्ये वापरलं. अमजद खानच्या या अंदाजावर दिग्दर्शकही प्रभावित झाले आणि त्याचे कौतुक करु लागले.

अमजद खानने 1951 पासून केली करिअरला सुरुवात
1951 मध्ये अमजद खानने नाजनीन या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच काही वर्ष नाटकांमध्ये देखील काम केले. 1973 मध्ये हिंदुस्तान की कसम चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली. 1975 मध्ये शोले चित्रपटात गब्बरची भूमिका साकारल्यानंतर अमजद खानला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याला लोक गब्बर म्हणूनच ओळखू लागले.

 


हेही वाचा :

मारकेश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रणवीरचा मल्हारी गाण्यावरील डान्स पाहून प्रेक्षकही थिरकले