घरमनोरंजन‘पठाण’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने दिले निर्देश

‘पठाण’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने दिले निर्देश

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या त्यांच्या आगामी पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या 25 जानेवारी ‘पठाण’रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासोबतच चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर पाहून शाहरुखचे अनेक चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. दरम्यान, या चित्रपटाबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली उच्च न्यायालाने सोमवारी यशराज फिल्म्स (वाईआरएफ) प्रोडक्शनला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यापूर्वी काही बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

एका नव्या रिपोर्ट्सनुसार, न्यायालयाने प्रोडक्शन कंपनीला दृष्टिहीन लोकांना OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी ‘सबटायटल्स, क्लोज कॅप्शनिंग आणि ऑडिओ वर्णन हिंदीमध्ये’ जोडण्यास सांगितले. याशिवाय, YRF ला हे बदल सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC)कडे पुनर्प्रमाणीकरणासाठी सादर करण्यास सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

- Advertisement -

खरंतर, खंडपीठानुसार, न्यायालयाने निर्मात्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत आणि सीबीएफसीला 10 मार्चपर्यंत निर्णय घेण्यास सांगितले आहे. पठाण चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. कारण, हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. दरम्यान, शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट एप्रिलमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल, त्यामुळे न्यायाधीश म्हणाले की निर्माते तोपर्यंत बदल करू शकतात.

‘बेशरम रंग’गाण्याला विरोध
चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया सतत मांडत आहेत.

- Advertisement -

4 वर्षानंतर शाहरुख खान चित्रपटामध्ये झळकताना
अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.


हेही वाचा :

परदेशात ‘पठाण’च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; पहिल्या दिवशीच होणार करोडोंची कमाई

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -