HomeमनोरंजनAttack On Actors : सैफचं नाही तर या कलाकारांवरही झाला होता हल्ला

Attack On Actors : सैफचं नाही तर या कलाकारांवरही झाला होता हल्ला

Subscribe

Saif Ali Khan Attack : बॉलीवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या मुंबईतील राहत्या घरी एका चोराने हल्ला केला. घरात शिरलेल्या चोराशी त्याची झटापट झाली होती. यावेळी चोराने सुऱ्याने सैफ अली खानवर सहा वार केले होते. यामध्ये सैफ अली खान गंभीररित्या जखमी झाला होता. मुंबईच्या लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. मात्र या घटनेने बॉलिवूड हादरलं आहे. मात्र सैफ हा पहिला कलाकार नाही की ज्याच्यावर हल्ला झाला आहे. याआधीही अनेक कलाकारांवर हल्ले झाले आहेत. आपण जाणून घेऊत्या कलाकारांबाबत. कॉमेडियन, दिग्दर्शक, अभिनेत्री अशा सगळ्यांवरच हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

सलमान खान

सलमान खानला बिश्नोई गँगकडून ठार करण्याच्या धमक्या आल्या आहेत. तसंच 2024 मध्ये सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये असलेल्या घराच्या बाहेर काही लोकांनी गोळीबार केला होता.

उदित नारायण

उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण अनेकदा वादात सापडला आहे. तो अनेकदा सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालताना दिसतो. अशाच एका घटनेत एका महिलेने गायकाला थप्पड मारली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य नारायणने महिलेसोबत गैरवर्तन केल्यामुळे त्याला सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारण्यात आली होती.

राकेश रोशन

कहो ना प्यार है हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर राकेश रोशन यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. खंडणीचे पैसे द्यायला नकार दिल्याने राकेश रोशन यांच्यावर दोनदा गोळीबार झाला पण ते या हल्ल्यातून कसेबसे वाचले होते.

रवीना टंडन

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री रवीना टंडन तिच्या कारमध्ये बसली होती आणि कारचालक कार तिच्या इमारतीच्या आतमध्ये घेऊन चालला होता. त्यावेळी दोन महिलांनी तिची कार थांबवली आणि गाडीच्या बाहेरुन रवीनाला मारण्याचा प्रयत्न केला.

एपी ढिल्लों

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंजाबी गायक एपी धिल्लन यांच्या कॅनडातील घरावर 14 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने याची जबाबदारी घेतली आहे. एपी ढिल्लों याला सलमानपासून दूर राहण्याचा सल्ला देताना बिश्नोई यांनी भविष्यात हल्ल्याचा इशाराही दिला होता.

शक्ती कपूर

बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांच्यावरही सार्वजनिक हल्ला झाला आहे. अभिनेता कोलकातामध्ये असताना दोन लोकांनी त्याच्यावर थेट हल्ला केला.

शाहिद कपूर 

2014 मध्ये हैदर या सिनेमाचं चित्रीकरण करताना शाहिद कपूर आणि इर्फान या दोन कलाकारांवर जमावाने कांगडी अर्थात निखारे फेकले होते. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि या दोन कलाकारांना वाचवलं.