Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी समंथाची प्रकृती खालावली; ट्वीट करून स्वतः दिली माहिती

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी समंथाची प्रकृती खालावली; ट्वीट करून स्वतः दिली माहिती

Subscribe

टॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या ‘शाकुंतलम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. समंथाचा पीरियड ड्रामा चित्रपट ‘शाकुंतलम’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. समंथा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमघध्ये व्यस्त आहे. मात्र, अशातच अचानक तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला सर्व प्रमोशन रद्द करावे लागले. याबाबत तिने स्वतः तिच्या चाहत्यांना तब्येतीबद्दल सोशल मीडियावर अपडेट केले आहे.

समंथाने ट्विट करत लिहिलंय की, “माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आणि तुमचे प्रेम मिळवण्यासाठी मी या आठवड्यात तुमच्यामध्ये येण्यासाठी खूप उत्साहित आहे. दुर्दैवाने व्यस्त शेड्यूल आणि प्रमोशनचा परिणाम झाला आणि मला ताप आला आहे. आणि माझा आवाज देखीव बसला आहे. कृपया आज संध्याकाळी एमएलआरआयटीच्या वार्षिक दिनाच्या कार्यक्रमात टीम शांकुतलमसोबत सहभागी व्हा…”

- Advertisement -

याआधी काही महिन्यांपूर्वी समंथाने सांगितले होते की, तिला ऑटो-इम्यून मायोसिटिसचे निदान झाले आहे. तिने अनेकदा तिच्या तब्येतीची चिंता व्यक्त केली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये, सामंथाने सोशल मीडिया पोस्टद्वारे मायोसिटिसशी झालेल्या लढाईबद्दल खुलासा केला होता.

‘शाकुंतलम’मध्ये असणार हे कलाकार

Samantha's 'Shaakuntalam' to release on November 4 - The Hinduया चित्रपटाचं दिग्दर्शन गुना शेखरने केलं असून हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 300 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. समंथा रुथ प्रभू व्यतरिक्त मल्याळम अभिनेता देव मोहन देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. शिवाय सचिन खेडेकर, कबीर बेदी, डॉ.एम.मोहन बाबू प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, अदिती बालन हे कलाकार महत्वाची भूमिका साकारताना दिसतील. हा चित्रपट 14 एप्रिल 2023 रोजी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आण हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटांमध्ये देखील दिसणार समंथा

- Advertisement -

या चित्रपटानंतर समंथा ‘फॅमिली मॅन 2’ मध्ये देखील दिसून येणार आहे. तसेच ती विक्की कौशलसोबत ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’मध्ये देखील दिसून येणार आहे.


हेही वाचा :

माझी छोटी लेडी… सुहाना ब्रँड अम्बेसिडर झाल्यानंतर शाहरुखची खास पोस्ट

- Advertisment -