लग्नाआधीच ‘या’ कारणामुळे विक्की कौशल आणि कतरिना कॅफमध्ये झालं कडाक्याचं भांडण

before wedding vicky kaushal lashes out on katrina kaif as their roka news leaked in media
लग्नाआधीच 'या' कारणामुळे विक्की कौशल आणि कतरिना कॅफमध्ये झालं कडाक्याचं भांडण

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कॅफच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. माहितीनुसार, ७ ते ९ डिसेंबर दरम्यान राजस्थानच्या सावई माधोपुर स्थिती सिक्स सेंसेस फोर्टमध्ये विक्की आणि कतरिनाचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. लग्नाची तयार झाली आहे. विक्की आणि कतरिनाने लग्नात येणाऱ्या पाहुण्याच्या यादीपासून लग्नात घालणाऱ्या कपड्यासाठी डिझाईनरपर्यंतच्या सर्व गोष्टी झाल्या आहेत. दरम्यान दिवाळीमध्ये कबीर खानच्या घरी विक्की आणि कतरिनाचा गुपचूप पद्धतीने रोका सोहळा पार पडला. या कपलबाबत सतत काहींना काहीतरी गोष्टी समोर येत असतात. आता विक्की आणि कतरिनामध्ये कडाक्याचं भाडणं झाल्याचं समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

माहितीनुसार, रोका सोहळ्याची बातमी माध्यमांमध्ये पसरल्यामुळे विक्की आणि कतरिनामध्ये कडाक्याचं भांडणं झालं होत. विक्की रोका सोहळ्याची बातमी लीक झाल्यामुळे खूपच रागात होता. यामुळे विक्की कतरिनासोबत भांडू लागला. दोघांना देखील माहित नव्हते की, रोका सोहळ्याची बातमी कशी लीक झाली? यामध्ये दोघांमध्ये खूप मतभेद झाले. नक्की कोणाच्या टीमनं रोका सोहळ्याची बातमी लीक केली हे त्यांना समजतं नव्हतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

यापूर्वी विक्की कौशलने रोका सोहळ्याच्या अफवेबद्दल बोलताना पापाराझींना दोष दिला होता. यासोबतच विक्की म्हणाला होता की, ‘तुमचेच चार मित्र अशा बातम्या पसरवत आहेत. मी योग्य वेळी सर्व गोष्टी करेन. आता योग्य वेळ नाही आहे.’


हेही वाचा – अपघातावर मात करत मनिषा केळकरने केले बॉडी ट्रान्सफोरमेशन