पॉल भावंडांनी गायलं ‘बेशरम रंग’ गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत असून 25 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. 8 दिवसात या चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून भारतातील अनेक चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. फक्त भारतातच नव्हे तर ‘पठाण’ची भुरळ आता परदेशातील प्रेक्षकांना देखील पडली आहे. टांझानियाच्या प्रसिद्ध पॉल भावडांना देखील ‘पठाण’मधील बेशरम रंग गाण्याची भुरळ पडली आहे.

पॉल भावंडांनी गायलं ‘बेशरम रंग’ गाणं

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

सध्या शाहरुखच्या ‘पठाण’ची क्रेझ जगभरात पाहायला मिळत आहे. टांझानियाच्या प्रसिद्ध पॉल भावडांना देखील ‘पठाण’मधील बेशरम रंग गाण्याची भुरळ पडली आहे. किली आणि नीमा या भावंडांनी ‘बेशरम रंग’ गाणं गायल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

दरम्यान, याआधी देखील या भावंडांनी बऱ्याच बॉलिवूड गाण्यावर डान्स केला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या भावंडांनी मराठी ‘वेड’ चित्रपटातील ‘वेड लावलंय’ गाण्यावर ताल धरला होता. यावेळी अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते.

पाकिस्तानी प्रेक्षकांना देखील ‘पठाण’ची भुरळ

परदेशातील इतर देशांसोबतच पाकिस्तानी प्रेक्षकांना देखील ‘पठाण’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. मात्र, मागील चार वर्षांपासून पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे 25 जानेवारी रोजी पाकिस्तान सोडून इतर अनेक देशांमध्ये ‘पठाण’ प्रदर्शित झाला. परंतु तरीही ‘पठाण’ पाकिस्तानमधील कराची येथे चोरुन दाखवला जात आहे. त्यासाठी प्रेक्षक 900 रुपयांचे एक तिकिट खरेदी करण्यासाठी देखील तयार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये यूके बेस्ड असलेल्या फायरवर्क इवेंट्स कंपनीने फेसबुक पोस्ट करुन ‘पठाण’च्या चित्रीकरणाची माहिती दिली होती. ही जाहिरात प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर अनेकांनी 900 रुपये देऊन तिकिटं बुक केली.


हेही वाचा :

शाहरुखच्या ‘पठाण’चा जगभरात डंका; 8 व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी