‘माझे नाव गुगल करण्यासाठी…’ प्रियंका चोप्राची Rosie O’Donnell च्या माफीवर प्रतिक्रिया, काय आहे प्रकरण ?

प्रियंका खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चाहत्यांच्या मते प्रियंका निक जोनसपेक्षा लोकप्रिय आहे. आमची पहिली भेट फार विचित्र होती त्यामुळे मी प्रियंका आणि निक त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांची माफी मागते, असे रोझीने म्हटले होते.

Best to take time to google my name Priyanka Chopra reacts to Rosie O'Donnell's apology
'माझे नाव गुगल करण्यासाठी...' प्रियंका चोप्राची Rosie O'Donnell च्या माफीवर प्रतिक्रिया, काय आहे प्रकरण ?

बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकेची प्रसिद्ध कॉमेडियन रोझी ओडोनलमुळे चर्चेत आली आहे. कॉमेडियन रोझी ओडोनल प्रियंकाची माफी मागणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. रोझी आणि प्रियंकाच्या पहिल्या भेटीत रोझीकडून झालेल्या चुकीची तिने माफी मागितली होती. रोझीच्या माफीवर आता प्रियंकाने प्रतिक्रिया दिली आहे. मला भेटण्याआधी माझे नाव गुगल करण्यासाठी तुम्ही वेळ काढायला हवा होता, असे प्रियंकाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?

अमेरिकेची प्रसिद्ध कॉमेडियन रोझी ओडोनेल हिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिने प्रियंकासोबत झालेल्या गैरसमजाविषयी सांगितले आहे. रोझी जेव्हा प्रियंकाला पहिल्यांदा भेटली तेव्हा ती निक जोनससोबत होती. प्रियंकाला पाहिल्यावर रोझीला वाटले की ती प्रसिद्ध लेखक दीपक चोप्रा यांची मुलगी आहे. निक प्रियंका रोझीला भेटले तेव्हा रोझीने प्रियंकाला ‘हाय’ म्हणत ‘मी तुझ्या वडिलांना ओळखते’, असे म्हटले. ‘तुम्ही त्यांना ओळखता ? तुम्हाला माहिती आहे माझे वडील कोण आहेत?’, असा प्रश्न प्रियंकाने केला. त्यावर रोझी म्हणाली ‘हो तुम्ही दीपक चोप्रा यांची मुलगी’, ‘नाही… भारतात चोप्रा हे कॉमन आडनाव आहे’, असे प्रियंका म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rosie O’Donnell (@rosie)

झालेल्या प्रकारानंतर प्रियंका रोझीला फार उद्धटपणे बोलली असा गैरसमज सर्वांचा झाला. गैरसमज दूर करण्यासाठी रोझीने प्रियंकाची माफी मागणारा व्हिडीओ शेअर केला. प्रियंका खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चाहत्यांच्या मते प्रियंका निक जोनसपेक्षा लोकप्रिय आहे. आमची पहिली भेट फार विचित्र होती त्यामुळे मी प्रियंका आणि निक त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांची माफी मागते, असे रोझीने म्हटले होते.

रोझीच्या या व्हिडीओवर प्रियंका म्हणाली, प्रत्येक जण मला ओळखत असेल हे जाणून घेण्यासाठी मी स्वत:ला कधीच गांभीर्याने घेतले नाही. पण जर तुम्ही तुमच्या विचित्र वागणूकीविषयी जाहीर माफी मागता तर मला वाटत की तुम्ही गूगलवर वेळ काढून माझे नाव किंवा माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा.


हेही वाचा – Amitabh Bachchan यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे HCचे पालिकेला निर्देश