घरताज्या घडामोडीVideo: नेहा पेंडसेचं 'भाबीजी घर पर हैं!'च्या सेटवर जंगी स्वागत

Video: नेहा पेंडसेचं ‘भाबीजी घर पर हैं!’च्या सेटवर जंगी स्वागत

Subscribe

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने ‘भाबीजी घर पर हैं!’ मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. नेहा पेंडसे या मालिकेत अनिता भाभी म्हणजेच गौरी मॅमची भूमिका करत आहे. नेहाचे अनिता भाभीच्या लूकमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे. तिने मरून कलरची प्लेन साडी नेसली आहे. नेहाचे या लूकमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. दरम्यान पहिल्याच दिवशी ‘भाबीजी घर पर हैं!’च्या सेटवर नेहाचे केक कापून जंगी स्वागत करण्यात आले आहे. एका इन्स्टाग्राम युझरने (Instagram@shubhangi_the_smiling_princess) नेहाचा स्वागताचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

या व्हिडिओमध्ये पाहू शकता, नेहाने केक कापल्यानंतर तिला सगळे केक भरवत सेटवर स्वागत करत आहेत. तर मनमोहन तिवारी म्हणजे रोहिताश्व गौड नेहाला फूल देताना दिसत आहे.

- Advertisement -

यापूर्वी ‘भाबीजी घर पर हैं!’ मालिकेतील अनिता भाभीची भूमिका अभिनेत्री सौम्या टंडन करत होती. पण ऑगस्ट २०२०मध्ये सौम्याने ‘भाबीजी घर पर हैं!’ मालिकेला अलविदा केले. मालिकेच्या सुरुवातीपासून सौम्या टंडन अनिता भाभीची भूमिका करत होती. आता याच भूमिकेत नेहा पेंडसे दिसणार आहे. नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर १९९९ साली ‘प्यार कोई खेल नहीं’ या चित्रपटातून नेहाने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर ती ‘देवदास’मध्ये दिसली. त्यानंतर ती अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत दिसली होती.


हेही वाचा – हिंदूंच्या भावना दुखवल्यामुळे ‘तांडव’ वेबसीरिज बंद करण्याची मागणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -