भारत गणेशपुरेला मातृशोक; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या मधून घरोघरी पोहोचलेले अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या आई श्रीमती. मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे निधन झाले आहे. आज (9 मार्च) पहाटे वृद्धापकाळाने अमरावतीच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने गणेशपुरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आज संध्याकाळी 5 च्या सुमारास त्यांची राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार आहे.

Bharat Ganeshpure Mother Passes Away


हेही वाचा : अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन, अनुपम खेर यांनी दिली माहिती