Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन रत्नागिरीत भरत जाधव यांनी व्यक्त केली नाराजी, नेमके कारण काय ?

रत्नागिरीत भरत जाधव यांनी व्यक्त केली नाराजी, नेमके कारण काय ?

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतील अफलातून अभिनेता म्हणून भरत जाधव यांची खास ओळख आहे. विनोदी भूमिकांपासून ते अनेक गंभीर धाटणीच्या भूमिका साकारत भरतने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच राज्य केलं आहे. तसेच मालिका असो, चित्रपट असो किंवा नाटक या तिन्ही क्षेत्रात भरत नेहमीच सर्रस ठरला आहे.

कोकण हे एक कलाप्रेमींचं शहर म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरीतून एका दिग्गज कलाकाराला नाराज होऊन परतावं लागल्याचं समोर आलं आहे. अभिनेता भरत जाधव यांनी नाट्यगृहाच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. रत्नागिरीतील नाट्यगृहांची अवस्था चव्हाट्यावर आली आहे. शनिवारी (२० मे) रोजी भरत यांच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग रत्नागिरीमध्ये होता. त्यावेळी नाट्यगृहातील एसी आणि साऊंड सिस्टिंमवरून भरत जाधव यांची नाराजी पाहायला मिळाली. ही उपकरणे सतत बंद पडत होती. अशातच या सर्व प्रकाराला वैतागून भरत जाधव यांनी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसमीरच आपली नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

Tu Tu Me Me Marathi Theatre Play Tickets - BookMyShow

भरत जाधव यांनी नाटकाच्या प्रयोगानंतर संताप व्यक्त करत जाहीर केले की, नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही. यासोबतच मेकअप रुम, व्यासपीठ आणि प्रेक्षक बसतात त्याठिकाणी एसी नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले ‘एसी नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून तुम्ही पाहा’, अशी कळकळीची विनंती भरत यांनी प्रेक्षकांना केली. त्यांनी असे देखील म्हटले की अशी परिस्थिती असताना प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता? शिवाय ‘रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही’, असंही त्यांनी प्रेक्षकांना हात जोडून माफी मागत जाहीर केलं.


- Advertisement -

 

हेही वाचा :

राजकारणात कोणीही कोणाचे… सचिन पिळगावकरांचं हे विधान नेमकं कुणासाठी?

- Advertisment -