घरमनोरंजन'भारत' चित्रपटाचे तिसरे पोस्टर लाॅंच; असा आहे कतरिनाचा लूक

‘भारत’ चित्रपटाचे तिसरे पोस्टर लाॅंच; असा आहे कतरिनाचा लूक

Subscribe

सलमान खानने कतरिना कॅफच्या भूमिकेबद्दल सांगताना लिहीले, "...और फिर हमारी ज‍िंदगी में आईं मैडम सर."

सलमान खानचा भारत चित्रपट २४ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित होण्यापुर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले जात आहे. भारतच्या पोस्टरमधून सलमान खानचा अनोखा अंदाज नुकताच समोर आला असून चित्रपटात त्याच्या सोबत दिसणाऱ्या अभिनेत्रीचा लूक देखील रिवील करण्यात आला आहे.

- Advertisement -

१७ एप्रिलला रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये सलमानसह कतरिना कॅफ ही दिसत आहे. सलमान खानने कतरिना कॅफच्या भूमिकेबद्दल सांगताना लिहीले, “…और फिर हमारी ज‍िंदगी में आईं मैडम सर.”

- Advertisement -

असा आहे कतरिनाचा लूक

भारत चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सलमानसह कतरिना वेगळ्या अंदाजात दिसत आहे. कतरिना फॉर्मल लूक सोबत कुरळ्या केसाच्या स्टाइलमध्ये ऑफिसरच्या रूपात बघायला मिळत आहे. तसेच या पोस्टरवर १९७० असे वर्ष लिहीले असून पोस्टरच्या खालच्या बाजूस काही घटनांची झलक दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -