घरमनोरंजनBharti Singh : माधुरीच्या गळ्यात पडून भारती सिंग रडली, कारण...

Bharti Singh : माधुरीच्या गळ्यात पडून भारती सिंग रडली, कारण…

Subscribe

टेलिव्हिजनची कॉमेडी क्वीन भारती सिंग तिच्या कॉमेडी टायमिंगसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रीय असणारी, भारती बऱ्याच वेळा सोशल मीडियावर फनी रिल्स पोस्ट करताना दिसते. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचे अनेक व्हिडीओ आपण पाहत असतो. इतकंच नाही तर त्यांचा स्टेज प्रेझेंस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. मोठी स्वप्न बाळगणाऱ्या भारतीला “द ग्रेट लाफ्टर चॅलेंज” या कार्यक्रमामुळे ओळख मिळाली. ती या कार्यक्रमामध्ये उपविजेते होती. पुढे तिने अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम करायला सुरुवात केली. विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे तिच्या कामाचे कौतुक होऊ लागले.

स्मॉल स्क्रिनवरील लोकप्रिय डान्सिंग रिअॅलिटी शो “डान्स दिवाने” हा शो लोकांना आवडत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. डान्स दिवाने सीजन 4 हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात माधुरी दीक्षित आणि सुनिल शेट्टी हे दोघे जजेसच्या पॅनेलवर आहेत तर, भारती सिंग या शोचं सुत्रसंचालन करत आहे. प्रत्येक आठवड्यात स्पर्धक शोमध्ये त्यांची उत्कृष्ट कामगिरी दाखवताना दिसतात.

- Advertisement -

या डान्स रिअॅलिटी शोची एक क्लिप सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या व्हिडिओमध्ये शो च्या पहिल्याच आठवड्यात एक परफॉर्मन्स पाहून भारती सिंग खूप भावूक झाली आहे. भारती एका लहान मुलाचा डान्स पाहून भावूक होते, ती माधुरी दीक्षित आणि सुनिल शेट्टीला म्हणते,  मी तुमच्याकडे येऊ शकत नाही कारण तिथे आली तर मी आणखी रडेन, यानंतर ती अश्रू पुसत वेटींग रुममध्ये जाते. त्यावेळी माधुरीही तिच्या मागे जाते. आणि माधुरी भारती सिंगला घट्ट मिठी मारते त्यावेळी भारतीला अश्रू अनावर होतात.

भारती रडत माधुरीला सांगते की,  “जेव्हापासून मला मुलगा झाला आहे तेव्हापासून मी आई वडीलांच्या भावना समजू लागली आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक पालकांच्या मी भावना समजू शकते. जेव्हा ती मुले डान्स परफॉर्मन्स करतात तेव्हा त्या पालकांचे चेहरे भावुक झालेले असतात ते सगळ बघुन भावूक व्हायला होतं.  माधुरी मॅडम माझ्या आधी त्यांच्या भावना तुम्हाला समजतील कारण तुम्हाला 2 मुलं आहेत.

- Advertisement -

खतरों के खिलाडी’, ‘झलक दिखला जा’, ‘द कपिल शर्मा शो’ यांसारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये ती झळकली आहे. ती सूत्रसंचालन देखील करते. २०१७ मध्ये तिने लेखक हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. लग्नापूर्वी बरीच वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. त्यांनी मिळून ‘नच बलिये’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. एप्रिल २०२२ मध्ये भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या बाळाचे नाव त्यांनी ‘लक्ष्य’ असे ठेवले असले तरी ते लाडाने त्याला ‘गोला’ म्हणून हाक मारतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -