भारती सिंग झाली ‘कास्टिंग काऊच’ची शिकार

Bharti Singh REVEALS she was TOUCHED inappropriately by show coordinators; says, 'I had no courage back then'
भारती सिंग झाली 'कास्टिंग काऊच'ची शिकार

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन भारती सिंग नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते. इंडस्ट्रीत कोणाही गॉडफादर नसताना स्वत;च्या हिंमतीवर वेगळे स्थान निर्माण केले. परंतु करियच्या सुरुवातीला तिलाही अनेक वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. दरम्यान एका मुलाखतील भारतीने मनीष पॉलला इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचची ती देखील कशी शिकार झाली याबद्दलचा अनुभव शेअर केला आहे.

इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचचा अनुभवाबद्दल  भारती सांगते. ‘मी अनेक ऑडिशनला माझ्या आईला सोबत न्यायचे. मात्र अनेकदा शोचे संयोजक मुलींशी चुकीते वागायचे. अनेकदा माझ्यासोबतही असेच वागले. माझ्या पाठीवरून हात फिरवा. एकाने तर माझ्या कमरेला हात लावण्याचा प्रयत्न केला. मला हे खूप विचित्र वाटले. कारण तो व्यक्ती माझ्या काकांच्या वयाचा होता. त्यामुळे तो असं चुकीचे का वागेल असे मला वाटायचे. कारण मी लहान असल्य़ामुळे मला अनेक गोष्टी कळायच्या नाहीत. परंतु आज त्या सर्व गोष्टी आठवल्या की वाटतं आपण किती मूर्ख होतो. असे  भारती म्हणाली.

दरम्यान एका ऑडिशनवेळी मी माझ्या मैत्रिणीसोबत गेली होतीय त्यावेळी ऑडिशन घेणारी व्यक्ती मुलींसोबत खूप वाईट प्रकारे वागते असे मी ऐकले होते,. त्य़ामुळे ऑडिशनला जाण्यापूर्वी मी माझ्या मैत्रीणीला म्हणाले जर मी १५ मिनिटात बाहेर नाही आले तर पोलिसांना फोन करुन बोलाव. असेही भारती सांगते.


ऐश्वर्या राय बच्चन इंस्टाग्रामवर केवळ ‘या’ एकाचं व्यक्तीला करतेयं फॉलो