Bharti singh : देशातील पहिली प्रेग्नंट अँकर असल्याचा भारती सिंगचा दावा; म्हणे…

भारती सिंग एक उत्तम कॉमेडियन तर आहेच पण ती अनेक शोमध्ये अँकर देखील आहे. तिचे अँकरिंग आणि तिने मारलेले पंच प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतात. मात्र,भारती सिंग गरोदर असून ती कलर्स वाहिनीवरील शो 'हुनरबाज- देश की शान'ची अँकरींर करणार आहे. यात तिच्यासोबत हर्ष लिंबाचियादेखील दिसणार आहे. भारतीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती देशाची पहिली प्रेग्नंट अँकर असल्याचे सांगत आहे आणि त्याचवेळी दोघांच्या पैशात तिघांकडून काम करुन घेत असल्याचा तिने दावा केला आहे.

Bharti singh said I am the first pregnant anchor in the country
देशातील पहिली प्रेग्नंट अँकर असल्याचा भारती सिंगचा दावा; म्हणे...

भारती सिंग एक उत्तम कॉमेडियन तर आहेच पण ती अनेक शोमध्ये अँकर देखील आहे. तिचे अँकरिंग आणि तिने मारलेले पंच प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतात. मात्र,भारती सिंग गरोदर असून ती कलर्स वाहिनीवरील शो ‘हुनरबाज- देश की शान’ची अँकरींर करणार आहे. यात तिच्यासोबत हर्ष लिंबाचियादेखील दिसणार आहे. भारतीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती देशाची पहिली प्रेग्नंट अँकर असल्याचे सांगत आहे आणि त्याचवेळी दोघांच्या पैशात तिघांकडून काम करुन घेत असल्याचा तिने दावा केला आहे. एखादी गर्भवती महिला असेल तर,त्या महिलेची विशेष काळजी घेतली जाते.याशिवाय तिला सांभाळून रहा,धावपळ करु नको यासारखे सल्ले काळजीपोटी वारंवार दिले जातात. याबाबत भारतीचा सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारती सिंहने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की,  महिलांना गर्भवती झाल्यानंतर घरात राहण्याची सक्ती केली जाते,मात्र ती जुनी विचारसरणी बदलू इच्छिते. एक स्त्री प्रेग्नंसीमध्ये तिचे कामे करु शकते. त्यामुळे ही भारतातील सर्व काळजी करणाऱ्या महिलांची विचारधारा बदलण्याचा निर्णय भारतीने घेतला आहे. या व्हिडिओमध्ये भारती आणि हर्ष दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये भारती सिंह मेकअप करत असून, ती थोडी घाबरली असल्याचे सांगत आहे. पण यासोबतच ती अनेक प्रेरणादायी गोष्टीही करते.भारती सिंहचा हा व्हिडिओ शेअर करत कलर्सने लिहिले आहे की, ‘देशातील पहिली गर्भवती अँकर ‘हुनरबाज’च्या मंचावर येत आहे. आपल्या मेहनतीने भारती संपूर्ण देशाची विचारसरणी बदलत आहे. या महिलेला सलाम .


हेही वाचा – Bachchan Pandey : अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार