कॉमेडीयन भारती सिंगला शीख समुदायावर विनोद करणे पडले महाग, गुन्हा होणार दाखल

चाहत्यांना हसवण्याच्या नादात भारतीने थेट शीख समुदायावरच टीका केली. यामुळे संतप्त झालेल्या शीख समुदायाने भारतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कॅमोडियन भारती सिंग सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. नुकताच तिने एका मुलाला जन्म दिला असून आई झाल्यानंतर ती सोशल मीडियावर फार व्यक्त होताना दिसत नव्हती. पण बऱ्याच दिवसांनी ती पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. पण चाहत्यांना हसवण्याच्या नादात भारतीने थेट शीख समुदायावरच टीका केली. यामुळे संतप्त झालेल्या शीख समुदायाने भारतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर भारतीने सावरासावर करत व्हिडीओच्या माध्यमातून शीख समुदायाची जाहीर माफी मागितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

भारतीच्या त्या व्हिडीओमध्ये ती एका शो दरम्यान अभिनेत्री जास्मीन भासीन सोबत बोलताना दिसत आहे. या गप्पांदरम्यान भारती दाढी ,मिशा असलेल्या व्यक्तींवर बोलताना दिसत आहे. भारती म्हणते की दाढी मिशी का नसावी. कारण दाढीमिशी असण्याचे अनेक फायदे आहेत. दूध प्या नंतर दाढी तोंडात घातली तर शेवयांची चव येते. माझे बरेच फ्रेंडस आहेत ज्यांची इतकी लांबलचक दाढी आहे. ज्यांच्या दाढीतून दिवसभर उवा काढता येतील.

भारतीच्या या वक्तव्याने शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून भारतीविरुद्ध गुन्हा दाखल करा आणि तिला जेलमध्ये टाका अशी विनंती करत आहेत. त्यावर भारतीने सावरासावर करण्याचा प्रयत्न केला असून तिचा एक माफीनाम्याचा व्हिडीओ तिने सोशल मडियावर टाकला आहे. आपल्याला कोणाच्याही भावना दुखवायच्या नसून आपण माफी मागत असल्याचं भारतीने यात म्हटल आहे.