घरमनोरंजनमुलाच्या जन्माच्या एक दिवस आधीपर्यंत Bharti Singh शूटिंगमध्ये होती व्यस्त; सेटवरील व्हिडिओ...

मुलाच्या जन्माच्या एक दिवस आधीपर्यंत Bharti Singh शूटिंगमध्ये होती व्यस्त; सेटवरील व्हिडिओ व्हायरल

Subscribe

कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. भारतीच्या घरी एका छोट्या राजकुमाराचा जन्म झाला आहे. मुलाच्या जन्मामुळे भारती आणि हर्ष खूप आनंदी आहेत. ही आनंदाची बातमी समोर आल्यापासून या जोडप्याचे चाहतेही अभिनंदन करत आहेत. भारतीच्या प्रसूतीनंतर तिचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर भारतीचा व्हिडिओ व्हायरल

भारतीने रविवारी मुलाला जन्म दिला. मात्र मुलाच्या जन्माआधीचा कॉमेडियन भारती एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शनिवारचा आहे. या व्हिडिओमध्ये भारती तिचा लव्हिंग पती हर्ष लिंबाचियाला पकडून उभी असल्याचे दिसतेय. यावेळी भारती हर्षला म्हणते की, मूल कधी होईल?

- Advertisement -

प्रसूतीच्या एक दिवस आधीपर्यंत भारती करत होती काम

भारती सिंगचे कामासाठीचे असलेल्या डेडिकेशनचे चाहत्यांनीही कौतुक केले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भारती सिंग मुलाला जन्म देण्याच्या एक दिवस आधी सुपर अॅक्टिव्ह होऊन काम करत होती. चाहते भारतीच्या या हिंमतीचे आणि धाडसाचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

चाहते झाले भारतीचे दिवाने

भारतीच्या व्हायरल व्हिडिओवर एका चाहत्याने तिचे कौतुक करत लिहिले की, भारती खूप प्रेरणादायी आहेस. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की – भारती ही खरी रॉकस्टार आहे. तर तिसऱ्या एका युजरने लिहिले की, ती खूप स्ट्रॉन्ग आहे.

भारती आणि हर्षने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर करून चाहत्यांना मुलगा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. भारती आणि हर्षच्या लहान बाळाची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. या आनंदी प्रसंगी चाहत्यांनी या जोडप्याचे खूप खूप अभिनंदन केले आहे.


सचिन पिळगावकरांच्या नव्या “धनगर राजा” गाण्याचा अॅनिमेटेड व्हिडीओ लाँच

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -