Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कॉमेडियन भारती सिंगने कमी केले तब्बल 15 किलो वजन, ट्रांसफॉर्मेशन पहाच

कॉमेडियन भारती सिंगने कमी केले तब्बल 15 किलो वजन, ट्रांसफॉर्मेशन पहाच

भारतीने स्वत:च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत वजन कमी केल्याचे दिसतेय. भारतीचं ट्रांसफॉर्मेशन लूक पाहून सगळीकडे सध्या तीच्या या लूकची चर्चा होत असून अनेकांनी तिची प्रशंसा देखील केली आहे.

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावर(Television) आपल्या अभिनय कौशल्याने लोकांचे मनोरंजन करणारी तसेच प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री कॉमेडीयन भारती सिंगची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. द कपिल शर्मा शोच्या(The Kapil Sharma Show) नवा सीझनमध्ये भारती सिंग (Bharti Singh)देखील झळकत आहे. नुकताच हा शो ऑन एयर झाला असून भारती सिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीने स्वत:च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत वजन कमी केल्याचे दिसतेय.(Bharti Singh Weight Loss) भारतीचं ट्रांसफॉर्मेशन लूक पाहून सगळीकडे सध्या तीच्या या लूकची चर्चा होत असून अनेकांनी तिची प्रशंसा देखील केली आहे. माहितीनूसार एका मीडिया रिपोर्टने दावा केला आहे की भारतीने तब्बल 15 किलो वजन घटवले आहे.( Bharti Singh Weight Loss journey and transformation)

76 किलो झाले वजन-

भारती सिंगचे वजन यापूर्वी 91 किलो इतके होते. मात्र भारतीने आपल्या डेली हॅबीट्समध्ये परिवर्तन करत वर्कआऊट,डाएट,मेहनत करुन तब्बल 15 किलो वजन किमी केले आहे. यामूळे भातीचे वजन सध्या 76 किलो इतके झाले आहे. भारतीला स्वत: मधील झालेला हा महत्वपूर्ण बदल पाहून विश्वासच बसत नाहीये. भारती म्हणाली , मला स्वत:लाच माहिती नाही की कशा प्रकारे मी इतक वजन कमी केलं. तसेच आता मला श्वास घेण्यास काहीच त्रास होत नाहीयो हलक फील होत आहे. याचप्रमाणे डायबिटीस आणि अस्थमा देखील कंट्रोल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

- Advertisement -

 

भारतीचा डाएट प्लान
- Advertisement -

वजन कमी करण्यासाठी केवळ कठोर परिश्रमच करावे लागत नाहीत, तर बरेच बलिदान द्यावे लागते. भारतीनेही तेच केले. भारतीने मधूनमधून उपवास करत असे . तसेच संध्याकाळी 7 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी 12 पर्यंत काहीही खात नाही.ती म्हणते की 30-32 वर्षांपासून मी खूप खाल्ल आहे.मात्र लॉकडाऊनने तिला स्वतःवर प्रेम करण्यासाठी बरेच काही शिकवले.

भारतीचा सल्ला-

भारतीने चाहत्यांना तसेच वजन कमी करु इच्छीनाऱ्या व्यक्तींना सल्ला दिला आहे की जर तुम्ही स्वतःवर प्रेम केले नाही तर कोणीही तुमच्यावर प्रेम करणार नाही. स्वतःवर प्रेम करणे आणि ते पडद्यावर पाहणे छान आहे. भारतीला स्वतः मधील परिवर्तन पाहून आनंद होत आहे.आणि त्यामूळे तिला स्वतःचा अभिमान वाटत आहे.


हे हि वाचा – …तर विराट कोहली माझा गळा कापेल; अनुष्का शर्माबद्दलच्या प्रश्नावर कुणाल कपूरचे उत्तर

- Advertisement -