घरमनोरंजनभोजपुरी चित्रपटांची बॉलीवुडला टक्कर, सर्वाधिक Google सर्च

भोजपुरी चित्रपटांची बॉलीवुडला टक्कर, सर्वाधिक Google सर्च

Subscribe

गुगलवर २०१८ या संपूर्ण वर्षात बॉलीवूड चित्रपटांपेक्षा कित्येत पटीने जास्त'सर्च व्ह्यूज' भोजपुरी चित्रपटांना मिळाले आहेत.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०१८ हे वर्ष सुगीचं ठरलं असं म्हणायला हरकत नाही. या वर्षात अनेक दर्जेदार हिंदी आणि मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम आणि पसंतीही मिळाली. या वर्षात रिलीज झालेल्या ‘धडक’, ‘संजू’ तसंच ‘डॉ. काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाईही केली. मात्र, २०१८ या वर्षात ‘गुगल’वर बाजी मारली ती भोजपुरी चित्रपटांनी. समोर आलेल्या अहवालानुसार, इंटरनेट युजर्सनी गुगलवर भोजपुरी चित्रपटांना सर्वाधिक सर्च केलं आहे. याशिवाय ऑनलाईन वेबसाईट्सवरदेखील भोजपुरी चित्रपट सर्वात जास्त पाहिले गेले आहेत. इतकंच नाही तर सोशल मीडियावरही नेटिझन्सनी भोजपूरी चित्रपटांनाच सर्वाधिक पसंती दिल्याचं अहवालातून समोर आलं आहे. विशेषत: भोजपूरी चित्रपटातील गाण्यांना युट्यूब आणि अन्य सोशल प्लॅटफॉर्म्सवर तूफान पसंती मिळाली आहे. भोजपुरी चित्रपटातील कलाकारांचा सर्वच प्रांतात खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याचाच परिणाम म्हणून २०१८ वर्षात गुगलवर भोजपुरी चित्रपटांना पसंती मिळाली आहे.


Thackeray Movie : ‘ठाकरे’ शिवाय अन्य चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही

गुगल ट्रेंड्समध्ये अव्वल…

गुगलवर ज्या गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या जातात तसंच ज्या गोष्टी अधिक काळासाठी ‘ट्रेंडिंग’ असतात, गुगलकडून त्यांचा डेटा काढला जातो. त्यानंतर या डेटाचं वार्षिक किंवा मासिक तत्वावर विश्लेषण (Analysis) केलं जातं आणि त्यावरुन वर्षभरात सर्वाधिक पसंती किंवा सर्च व्ह्यूज मिळवलेल्या चित्रपटाला, गाण्याला किंवा अन्य डेटाला ‘सर्वाधिक पसंतीचा डेटा’ घोषित केलं जातं. याच आकडेवारीनुसारच, यंदाच्या वर्षी भोजपूरी चित्रपट, भोजपूरी गाणी आणि भोजपूरी कलाकारांना Google वर सर्वाधिक सर्चिंग व्ह्यूज आणि पसंती मिळाली आहे. याच आकडेवारीवरुन समोर आलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी क्रिकेट आणि अन्य विषयांवरील बातम्यांच्या तुलनेत चित्रपटसृष्टीशी निगडीत घडामोडींचा Google सर्च वाढला आहे. २०१८ या वर्षात आलेले दर्जेदार चित्रपट हे या सर्च वाढीमागील कारण असल्याटचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

- Advertisement -

साऊथ चित्रपटांच्या हिंदी व्हर्जन्सना पसंती

गुगलच्या आकडेवारीतून समोर आलेल्या माहितीनुसार, साऊथ इंडियन चित्रपटांच्या हिंदी डबिंग व्हर्जन्सनाही लोकांची भरपूर पसंती मिळाली आहे. दाक्षिणात्य भाषा न समजणाऱ्या अन्य भाषिक प्रेक्षकांनी या वर्षात हिंदीत डब करण्यात आलेले साऊथ इंडियन चित्रपट इंटरनेटवर सर्वाधिक पाहिले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -