‘भोला’ आता OTT वर ; पण मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट 30 एप्रिल रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजयसोबत तब्बूही मुख्य भूमिकेत आहे. अजय आणि तब्बूच्या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ‘भोला’ हा चित्रपट प्रदर्शित होताच हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 111.64 कोटींचा व्यवसाय केला. अशातच, आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

‘भोला’ आता OTT वर

भोला हा तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट कैथीचा अधिकृत रिमेक आहे. या वर्षात ‘भोला’ हा बॉलीवूडचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असला आहे. आता नुकताच हा ओटीटीवर देखील प्रदर्शित झाला आहे. हा ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला 399 रुपये मोजावे लागतील.

काय आहे भोलाची कथा?

भोलाची कथा एक वडील (अजय देवगण) आणि त्याची 10 वर्षांची मुलगी यांच्याभोवती फिरते. भोला तुरुंगात आहे आणि आपल्या मुलीला भेटण्यासाठी आसुसलेला आहे. 10 वर्षांनंतर त्याची सुटका झाली आणि तो आपल्या मुलीला पहिल्यांदा भेटण्यासाठी उत्सुक आहे, परंतु भोला अचानक अशा काही परिस्थितीत अडकतो की त्याच्या जीवाला धोका असतो. आता तो आपल्या मुलीला कधी भेटू शकेल की नाही आणि तो स्वतःला संकटातून कसे बाहेर काढेल, या विषयावर आधारित ‘भोला’ चित्रपट आहे.

दरम्यान, ‘भोला’ चित्रपटात तब्बू आणि अजय देवगण व्यतिरिक्त अमला पॉल, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आणि गजराज राव हे कलाकार देखील आहेत.‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा रिमेक आहे. ‘दृश्यम 2’ नंतर या चित्रपटाद्वारे आता अजय आणि तब्बूची जोडी 9व्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसत आहे.


हेही वाचा  :

त्यांना महत्त्व दिल्यामुळे मी डोअरमॅटसारखी झाले… प्रियंकाचा खुलासा