Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन भूलभूल्लैया -२ मध्ये अक्षय नाहीतर कार्तिक करणार धमाल

भूलभूल्लैया -२ मध्ये अक्षय नाहीतर कार्तिक करणार धमाल

भूल भल्लैया २ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली असून यामध्ये अक्षय कुमार नाहीतर कार्तिक आर्यन दिसणार आहे. याबरोबरच कियारा अडवाणी आणि तब्बू ह्या देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Related Story

- Advertisement -

‘भूलभल्लैया २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. १९ नोव्हेंबर २०२१ मध्ये ‘भुलभुल्लैया २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारच्या ‘भुलभुल्लैया’ या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. मात्र त्याच्या या सिक्वलमध्ये अक्षय कुमार एवजी कार्तिक आर्यन मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. आर्यनसोबत ‘कियारा अडवाणी’ ही मुख्य अभिनेत्रीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तब्बूची ही या सिनेमात विशेष भूमिका पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

- Advertisement -

हा सिनेमा जुलै २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रिकरण पूर्ण न झाल्यानं प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर या चित्रपटाच्या चित्रिकरणाची तारीख ही प्रेक्षकांच्या समोर आली आहे. तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या कार्तिक आर्यनचा सिनेमामधील लूक दिसून येतोय. भगवी वस्त्र आणि खांद्यावर झोळी घेतलेल्या ‘कार्तिक’चा लूक ‘भुलभलैया’च्या पहिल्या भागातील अक्षय कुमारच्या लूक सारखाच दिसून यतोय.अक्षयच्या भुलभुल्लैयाने बॉक्स ऑफिसवर धमाका घातला होता. या चित्रपटातून अक्षयने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. त्यामुळे आता कार्तिक आर्यनची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल का हे पाहण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागेल.

- Advertisement -