‘भूलभुलैया 2’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; लवकरच करणार 100 कोटींचा टप्पा पार

सूत्रांच्या मते 'भूलभूलैया 2' चित्रपटाने शुक्रवारी 14.11 करोड, शनिवारी 18.34 करोड, रविवारी 23.51 करोड, सोमवारी 10.75 करोड मंगळवारी 9.56 करोडच्या कलेक्शन सह ७६.२७ करोड कमावले आहेत.

सध्या ‘भूलभूलैया 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 75 करोडची कमाई केली असून लवकरच हा चित्रपट 100 करोडचा आकडा पार करण्याची दाट शक्यता जाणवत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी 9.56 करोड कमावले आहेत.

‘भूलभूलैया 2’ चित्रपटाची जबरदस्त कमाई
सूत्रांच्या मते ‘भूलभूलैया 2’ चित्रपटाने शुक्रवारी 14.11 करोड, शनिवारी 18.34 करोड, रविवारी 23.51 करोड, सोमवारी 10.75 करोड मंगळवारी 9.56 करोडच्या कलेक्शन सह ७६.२७ करोड कमावले आहेत.

कार्तिकच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये ‘भूल भूलैया २’चा सहभाग

‘भूलभूलैया 2’ चित्रपटाचा यावर्षीच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत सहभाग झाला आहे.2022 मध्ये मंगळवारच्या सर्वाधिक कमाईमध्ये ‘भूलभूलैया 2’ तिसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी 18 करोडची कमाई केली होती. तर ‘गंगूबाई काठियावाडी’ने 10.01 करोडची कमाई केली होती. ‘भूलभूलैया 2’ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून ‘भूलभूलैया 2’ने पाचव्या दिवशी 9.56 करोडची कमाई केली आहे. कार्तिक आर्यनच्या करिअर मधील ‘भूलभूलैया 2’ हा सर्वाधिक सुपरहिट चित्रपट सिद्ध होत आहे.

‘भूलभूलैया 2’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनीज बज्मी यांनी केले असून चित्रपटात कार्तिक आर्यन सोबत तब्बू, कियारा अडवाणी सुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत.

 


हेही वाचा :‘या’ दिवशी होणार ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च