कार्तिकच्या ‘Bhool Bhulaiyaa 2’ ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; कमाईचा आकडा तर पाहा

bhool bhulaiyaa 2 box office collection day 9 film enters 100 crore club kartik aaryan
100 कोटींच्य क्लबमध्ये Bhool Bhulaiyaa 2 ची एन्ट्री; कमाईचा आकडा तर पाहा

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा चित्रपट भूल भुलैया 2 ने बॉक्स ऑफिसवर आपली ताकद पुन्हा एकदा दाखवली आहे. (Bhool Bhulaiyaa 2 Box Office ) चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपटाने आता कार्तिक आणि कियारा यांच्या चित्रपट कारकिर्दीला यशाचे पंख लावत आहे. भूल भुलैया 2 रिलीजच्या 9 व्या दिवशी 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होत नवा विक्रम केला आहे. (Bhulaiyaa 2 BO Collection Day 9)

100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेल्या या चित्रपटाने शनिवारी 11.35 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. यासह चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 9 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 109.92 कोटींची कमाई करून एक नवा विक्रम केला आहे.

पहिल्या दिवसापासून चित्रपटाची चांगली कमाई

भूल भुलैया 2 पहिल्या दिवसापासून रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 14.11 कोटी कमाई करत आपले खाते ओपन केले. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असून तुफान वेगाने पुढे जात आहे. ‘भूल भुलैया 2’च्या झंझावातासमोर कंगना राणौतचीही धाकड सिनेमाही चालला नाही. शुक्रवारपर्यंत या चित्रपटाने 98.05 कोटींची कमाई केली होती. कार्तिकचा चित्रपट 2022 च्या पहिल्या पाच महिन्यांत तिसरा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. त्याखालोखाल The Kashmir Files (250 कोटी) आणि गंगूबाई काठियावाडी (128 कोटी) आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना भुल भुलैया 2 हा सिनेमा किती आवडतोय याची कल्पना करा.

कार्तिक आणि कियारा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट भूल भुलैया 2 बॉक्स ऑफिसवर (Bhulaiyaa 2 Saturday Collection) अपेक्षेपेक्षा दुप्पट कामगिरी करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील बहुतांश शो हाऊसफुल्ल जात आहेत. कार्तिक आणि कियारा देखील त्यांच्या चित्रपटाच्या यशाने खूप आनंदी आहेत आणि त्यांनी या चित्रपटाद्वारे स्वतःला सिद्ध केले आहे की, ते बॉलिवूडचे चमकणारे तारे आहेत. त्याचे चाहतेही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत.


‘Khatron Ke Khiladi 12’ मध्ये Rubina Dilaik पासून Jannat Zubair पर्यंत ‘या’ स्पर्धकाचा असणार सहभाग