घरमनोरंजनBhool Bhulaiyaa 2 : 'भूलभुलैया 2' मधील तब्बूचा फर्स्ट लूक आऊट; ...

Bhool Bhulaiyaa 2 : ‘भूलभुलैया 2’ मधील तब्बूचा फर्स्ट लूक आऊट; मेमध्ये रिलीज होणार सिनेमा

Subscribe

भूल भुलैया 2' हा अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

अक्षय कुमार स्टारर भूल भुलैया हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाला मिळालेला चांगला प्रतिसाद आणि प्रेम पाहून भूल भुलैया 2 लवकरचं चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच भूल भुलैया 2 चा टीझर रिलीज झाला असून प्रेक्षक आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘भूल भुलैया 2’ ची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतसे या चित्रपटातील कलाकारांचे लूक आऊट होत आहेत. काल अभिनेत्री कियारा अडवाणीने चित्रपटातील तिच्या भूमिकेवरून पडदा उचलला होता, तर आता शुक्रवारी चित्रपटातील दुसऱ्या अभिनेत्री तब्बूनेही तिचा लूक आऊट केला आहे. तिच्या फर्स्ट लूकने चाहत्यांची आणि फॉलोअर्सची मने जिंकली आहेत. त्यामुळे ज्यांना हॉरर प्लस कॉमेडी चित्रपट आवडतात त्यांची उत्सुकता अधिक वाढणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

- Advertisement -

तब्बूने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘भूल भुलैया 2’ मधील तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूप घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. मोशन पोस्टरमध्ये प्रथम तब्बूचे त्रासलेले डोळे दाखवण्यात आले आहेत. हळूहळू पोस्टर पुढे सरकते आणि तब्बूच्या मागे एक आरसा दिसतो. ज्यामध्ये भूताची एक सावली दिसते आणि मागून भूताच्या हसण्याचा आवाजही ऐकू येतो. हे ऐकून तब्बू बिथरलेल्या अवस्थेत दिसतेय. यासोबतच या व्हिडिओमध्ये ‘आमी जे तोमर’ हे आयकॉनिक गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजताना ऐकू येते. तिने शेअर केलेला हा व्हिडिओ खूपच भयानक आहे.

पोस्ट शेअर करताना तब्बूने कॅप्शनमध्ये लिहिले की, “भूत किंवा देवदूत? किंवा या दोघांपैकी कोणीही…” अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी तसेच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचा लूक पाहून एक्साइटेड आणि अमेझिंग अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

- Advertisement -

अक्षय कुमार स्टारर ‘भूल भुलैया’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. चित्रपटाला मिळालेला चांगला प्रतिसाद आणि प्रेम पाहून निर्माते लवकरच ‘भूल भुलैया 2’ चित्रपटगृहात आणणार आहेत. यापूर्वी ‘भूल भुलैया 2’ चा टीझर निर्मात्यांनी रिलीज केला होता, त्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ‘भूल भुलैया 2’ मध्ये दिसलेली बॉलीवूड अभिनेत्री तब्बूने या चित्रपटातील तिचा पहिला लूक शेअर केला आहे. अभिनेत्रीने तिच्या फर्स्ट लूकने तिच्या चाहत्यांची आणि फॉलोअर्सची मने जिंकली आहेत.

या पोस्टला सोशल मीडिया यूजर्स आणि सेलिब्रिटींकडून अनेक कमेंट्स आणि लाईक्स मिळाले आहेत. तब्बूच्या लूकवर प्रतिक्रिया देताना अभिनेता सिकंदर खेरने लिहिले – ‘नेहमीप्रमाणेच तुमच्या कामाची वाट पाहत आहे.’

याआधी अभिनेत्री कियारा अडवाणीनेही या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर केला होता, ज्यामध्ये ती रीतची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर गेल्या आठवड्यात कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आणि चाहत्यांना त्याच्या ‘रूह बाबा’ या पात्राची ओळख करून दिली.

‘भूल भुलैया 2’ हा अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर भूषण कुमारच्या प्रोडक्शन हाऊस टी-सीरीजच्या बॅनरखाली तो बनवला जात आहे. तब्बू आणि कियारा अडवाणी व्यतिरिक्त या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय राजपाल यादव, संजय मिश्रा आणि तब्बू ‘भूल भुलैया 2’ मध्ये दिसणार आहेत. हा हॉरर कॉमेडी-ड्रामा चित्रपट 20 मे 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. याआधी हा चित्रपट जुलै 2020 मध्ये रिलीज होणार होता पण कोरोनामुळे रिलीज पुढे ढकलण्यात आला होता.


.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -