Bhool Bhulaiyaa 2: कार्तिकने घेतला कंगनाशी पंगा, बॉक्स ऑफिसवर ‘भूल भुलैया 2’ ठरला सुपरहिट

20 मे रोजी शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 'धाकड' आणि 'भूल भुलैया2' हे दोन्ही सिनेमा एकत्र  धडकले. मात्र कार्तिक आर्यनच्या सिनेमाने कमाईच्या बाबतीत कंगनाला मागे टाकलं आहे.

Bhool Bhulaiyaa 2Box Office Collection
Bhool Bhulaiyaa 2: कार्तिकने घेतला कंगनाशी पंगा, बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2' ठरला सुपरहिट

सिनेमा रिलीज झाल्यावर बॉक्स ऑफिसवर कोणत्या सिनेमाने किती गल्ला जमवला कोणता सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला याकडे सर्वांच लक्ष लागून राहीलेलं असतं. नुकतंच बॉलिवूडमध्ये दोन तगड्या कलाकारांचे सिनेमा रिलीज झाले आहेत. अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik aryan) ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa2)आणि बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौतचा (Kangna Ranut)’धाकड'(Dhaakad). मात्र या दोघांपैकी 13.50 कोटी रुपयांची मजल गाठत सलग दुसऱ्या दिवशी कंगनाच्या ‘धाकड’ला ‘भूल भुलैया 2’ सिनेमाने मागे सोडलं आहे.(Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection)

कार्तिकने घेतला कंगनाशी पंगा

20 मे रोजी शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर ‘धाकड’ आणि ‘भूल भुलैया2’ हे दोन्ही सिनेमा एकत्र  धडकले. मात्र कार्तिक आर्यनच्या सिनेमाने कमाईच्या बाबतीत कंगनाला मागे टाकलं आहे. 13.50 कोटी रुपयांची आकडेवारी गाठत कार्तिकने सुरूवात केली. आणि विकेंडच्या दुसऱ्या दिवशी ‘भुल भुलैया2’ चा इन्कम रेट हा 35 टक्क्यांनी वाढला. यावेळी कमाईचा आकडा हा 18 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.

‘भूल भुलैया 2’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

20 मे 2022, पहिला दिवस, शुक्रवार – 13.50 कोटी रुपये
21 मे 2022, दिवस 2, शनिवार – रु. 18 कोटी
एकूण कलेक्शन – रु. 31.50 कोटी

कंगनाच्या ‘धाकड’ला कमी प्रतिसाद

दरम्यान कंगना रनौतच्या ‘धाकड’ सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर हा हवा तसा करिष्मा दाखवू शकला नाही. मीडिया रिपोर्टनुसार पहिल्या दिवशी धाकड सिनेमाने 1 कोटी आणि दुसऱ्या दिवशी फक्त 75 लाख रुपये कमाई केली आहे. मात्र कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून उदार मनाने कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणीला मनापासून शुभेच्छा देखील दिल्या आहेत.


हे ही वाचा –  ‘संस्कारी बहू’ टीना दत्ताने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, असा स्विमसूट केला परिधान