घरमनोरंजनतब्बूने 'Bhool Bhulaiyaa 2' सिनेमाचे शूटिंग केले पूर्ण

तब्बूने ‘Bhool Bhulaiyaa 2’ सिनेमाचे शूटिंग केले पूर्ण

Subscribe

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू तिच्या दमदान अभिनयासाठी ओखळली जाते. त्याचवेळी आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री तब्बूने (Tabu) नुकतेच ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याची माहिती तिने स्वत: सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. तब्बूने इंस्टाग्रामवर केक कापतानाचे फोटो शेअर केला असून संपूर्ण कलाकारांची टीम आणि क्रू मेंबर्स सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.

इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, ‘ज्याची सुरुवात चांगली आहे, त्याचा शेवटही चांगला आहे. भूल भुलैया 2 बनवण्याचा आमचा प्रवास आज संपला आहे. या पोस्टवर त्यांचे चाहते उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. ‘भूल भुलैया 2’ हा दिग्दर्शक अनीस बज्मी दिग्दर्शित एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

- Advertisement -

‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता पण कोरोना महामारीमुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. नंतर हा सिनेमा 25 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण एसएस राजामौलींचा आरआरआर सिनेमा त्याचदिवशी प्रदर्शित होत असल्याने ‘भूल भुलैया 2’ सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

- Advertisement -

या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत कियारा अडवाणी, परेश रावल, राजपाल यादव हे देखील दिसणार आहेत. कार्तिक, कियारा आणि तब्बू या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यादांच एकत्र काम करताना दिसून येणार आहेत. हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या भूल भुलैया या चित्रपटाचा सिक्वेल आहे. त्यावेळी  बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सोबत विद्या बालन एका महत्वाच्या भूमिकेत दिसले होते तर परेश रावल आणि राजपाल यादव देखील या चित्रपटाचा भाग होते जे त्याच्या दुसऱ्या भागातही आहेत.

‘भूल भुलैया’च्या पहिल्या भागाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आणि हा चित्रपटही खूप आवडला. त्याचवेळी या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे, ज्यामध्ये एवढी दमदार व्यक्तिरेखा आहे की, हा चित्रपट पडद्यावर थिरकायला सज्ज होईल अशी अपेक्षा आहे. आधी हा चित्रपट 25 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, परंतु आता तो 20 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -