Shweta Tiwari Controversy: ‘ब्रा आणि भगवान’ कमेंटमुळे श्वेता तिवारी विरोधात FIR दाखल, श्वेता म्हणते…

कार्यक्रम सलील आचार्य होस्ट करत होता. त्याने यावर स्पष्टीकरण देत म्हटले, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मोठा गोंधळ आहे. त्यातून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. कार्यक्रम मी होस्ट करत होतो. मीच एक प्रश्न विचारला होता त्यातील हा एक संदर्भ आहे.

bhopal FIR registared against Shweta Tiwari on bra and bhagwan controversial statement
Shweta Tiwari Controversy: 'ब्रा आणि भगवान' कमेंटमुळे श्वेता तिवारी विरोधात FIR दाखल, श्वेता म्हणते...

बिग बॉस 4 विजेती आणि टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीच्या ‘मेरी ब्रा का साइज भगवान ले रहा हैं’ या वादग्रस्त  वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. (Shweta Tiwari Controversy)  भोपाळमध्ये एका वेब सिरीजच्या प्रमोशनदरम्यान तिने हे वक्तव्य केले. तिच्या या वक्तव्याची मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी दखल घेत 24 तासात चौकशी करुन रिपोर्ट देण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले होते आणि त्यानंतर आता भोपाळमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारी विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. लोकांच्या धार्मिक भावना दुखाल्याचा आरोप करत श्वेतावर भारतीय दंडसंहितेच्या कलम 295अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्वेता तिवारीने केलेल्या या वक्तव्याची क्लिप मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी तो व्हिडीओ पाहिला आणि श्वेता तिवारीचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचे म्हणत 24तासात या प्रकरणाची चौकशी करुन रिपोर्ट सादर करा असे आदेश दिले होते. संपूर्ण प्रकरणाची पुष्टी करुन श्वेता तिवारीच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेस नेते नरेंद्र सलूजा यांनी देखील श्वेता तिवारीच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत लवकरात तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. व्हिडीओ पाहून त्यांनी असे म्हटले होते की, श्वेता तिवारी उघडपणे देवाचा अपमान करत आहे. तिच्या या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.

का केलं श्वेता तिवारीने हे वादग्रस्त वक्तव्य ?

श्वेता तिवारीच्या शो स्टॉपर – मीट द ब्रा फिटर या आगामी वेब सिरीजचे शुटींग भोपाळमध्ये सुरू आहे. याच निमित्ताने झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वेब सिरीजमधील सर्व कलाकार उपस्थित होते. हा कार्यक्रम सलील आचार्य होस्ट करत होता. त्याने यावर स्पष्टीकरण देत म्हटले, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मोठा गोंधळ आहे. त्यातून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. कार्यक्रम मी होस्ट करत होतो. मीच एक प्रश्न विचारला होता त्यातील हा एक संदर्भ आहे.

शो स्टॉपर – मीट द ब्रा फिटरमध्ये अभिनेता सौरभ जैन देखील आहे. सौरभने याआधी महाभारत सारखी पौराणिक मालिका केली आहे आणि त्यानंतर आता थेट तो एका ब्रा फिटरची भूमिका साकारणार आहे. यावरुन त्याला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गंमत करत श्वेता तिवारी म्हणाली, पाहा देवाच्या भूमिकेनंतर थेट ब्रा फिटर, याची जंप बघा. म्हणजे माझ्या ब्राची साइची साइज आता देव घेणार, असे श्वेता तिवारी म्हणाली. या वक्तव्याचा थेट देवाशी संदर्भ नसून सौरभ जैनच्या कॅरक्टरविषयी श्वेताने हे वक्तव्य केले होते.

श्वेताची संपूर्ण क्लिप पूर्णपणे ऐका. तिच्या बोलण्याचा संदर्भ वेगळा असून व्हिडीओमधील काही क्लिप्स चुकीच्या पद्धतीने व्हायरल केल्या जात असल्याचे सलिल आचार्यने म्हटले आहे.


हेही वाचा – ‘ब्रा साईज आणि भगवान’ Shweta Tiwari चे वादग्रस्त वक्तव्य, गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश