Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन भूमि पेडणेकरची अक्षयच्या ‘रक्षाबंधन’ सिनेमात झाली दमदार एंट्री

भूमि पेडणेकरची अक्षयच्या ‘रक्षाबंधन’ सिनेमात झाली दमदार एंट्री

आनंद एल राय (Anand L Rai) यांच्या आगामी 'रक्षाबंधन' सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसचे संकट देशावर  अद्याप कायम आहे. योग्य ती खबरदारी घेत काही जिल्ह्यात लॉक डाऊन हटवण्याचा तसेच निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशातच सिनेमाचे शूटिंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नुकतच अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar)आणि आनंद एल राय (Anand L Rai) यांच्या आगामी ‘रक्षाबंधन’ सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे. वृत्तानुसार जून महिन्याच्या शेवटी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. नुकतच सिनेमात भूमि पेडणेकर (Bhumi Pednekar)वर्णी लागली आहे. अशी घोषणा करण्यात आली आहे. खिलाडी अक्षय कुमारने स्वत: याबाबत माहिती देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा ते दिसून येते. आणि खरंच आम्ही आहोत… आता ‘रक्षाबंधन’ सिनेमात भूमि पेडणेकर जोडली गेली आहे.” अशा आशयाचे कॅप्शन देत अक्षयने भूमि,दिग्दर्शक आनंद एल राय आणि स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास सध्या अक्षय कमालीचा व्यसता आहे. बेलबॉटम,रामसेतु,बच्चन पांडे, यासारख्या सिनेमाची लिस्ट त्याच्याकडे आहे.  तसेच भूमि आणि अक्षय ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या सिनेमात एकत्र झळकले होते दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती.


- Advertisement -

हे हि वाचा –  विरुष्काच्या बेबी Vamikaची आणखी एक झलक समोर, डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत वामिकाचा फोटो व्हायरल

- Advertisement -