घरमनोरंजनअभिनेत्री भूमी पेडणेकरच्या फोटोशूटवर भडकले नेटकरी; केल्या भन्नाट कमेंट

अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या फोटोशूटवर भडकले नेटकरी; केल्या भन्नाट कमेंट

Subscribe

सुंदर फोटोशूट असताना देखील सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच भडकले

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या एका फोटोची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. सोशल मीडियावर चर्चेत असणारा हा फोटो वॉग इंडिया या मासिकासाठी करण्यात आलेल्या फोटोशूटचा आहे. या चर्चेत असणाऱ्या फोटोला वॉग इंडिया मासिकाचे कव्हरसाठी निवडण्यात आले होते. या चर्चेत असणाऱ्या आणि नेटकरी त्यावर भडकलेल्या फोटोमध्ये भूमी व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून डार्क रंगाची लिपस्टिकमध्ये खूप सुंदर दिसतेय. असा सुंदर फोटोशूट असताना देखील सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. मात्र या फोटोमध्ये असे काय आहे की, या फोटोवर युजर्स नाराज असून या फोटोला बघून नेटकऱ्यांनी भूमीला चांगलेच ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे.

भूमीच्या या फोटोवर नेटकरी भडकले

- Advertisement -

याकारणामुळे नेटकरी भडकले

वॉग इंडियाच्या कव्हर पानावर भूमीचा फोटो खूपच वेगळा दिसत आहे. कारण या फोटोमध्ये जास्त मेकअप आणि नको तेवढे फोटोशॉप केल्याने ती जशी प्रत्यक्षात त्यापेक्षा भूमीचा लूक वेगळाच दिसतोय. या कारणामुळेच भूमीला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया करण्यास सुरूवात केली असून तिची चांगलीच मजाक देखील उडवली आहे.

- Advertisement -

अशा केल्या भन्नाट प्रतिक्रिया

  • फोटोला किती व्हाईटवॉश केले आहे…
  • बेकार फोटोशॉप…
  • एवढाही फोटोशॉपचा वापर करू नये की, प्रत्यक्ष असणारे रूपच बदलेल…

तर काही लोकांनी या फोटोमध्ये दिसणारी भूमी पेडणेकर नाहीच… अशी देखील प्रतिक्रिया केली आहे. तर काहींनी या फोटोचे चांगलेच कौतुक केले असून हा फोटो स्टनिंग फोटो असल्याचे सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -