भूषण कुमार आणि संदीप रेड्डी वांगा यांची अल्लू अर्जुनसोबत आगामी चित्रपटाची घोषणा

भारतातील तीन पॉवरहाऊस – निर्माता भूषण कुमार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुन एका मोठ्या सहयोगासाठी एकत्र आले आहेत. या असोसिएशन अंतर्गत टी-सीरीज फिल्म्स प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्सद्वारे चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

अलीकडेच, निर्माता भूषण कुमार, प्रणय रेड्डी वांगा, सह-निर्माता शिव चानना, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि सुपरस्टार अल्लू अर्जुन यांनी या मोठ्या सहयोगावर मोहर लावण्यासाठी भेट घेतली. अशातच, अल्लू अर्जुन अभिनीत तसेच, टी-सीरीज फिल्म्स प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्सद्वारे निर्मित या चित्रपटाचे शूटिंग संदीप वांगा यांच्या ‘स्पिरिट’चे रॅप झाल्यानंतर सुरु होईल.


हेही वाचा :

मला शेअर्सचे शून्य ज्ञान… सेबीने बंदी घातल्यानंतर अर्शद वारसीने दिली प्रतिक्रिया