घरमनोरंजनभूषण कुमारने फेटाळले बलात्काराचे आरोप, दिलं स्पष्टीकरण

भूषण कुमारने फेटाळले बलात्काराचे आरोप, दिलं स्पष्टीकरण

Subscribe

संपुर्ण घटनेबाबत भूषण कुमार यांनी अधिकृतरीत्या स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तीमत्व असणारे टी-सीरिज (T-Series) कंपनीचे सर्वेसर्वा भूषण कुमार(Bhushan Kumar) यांच्यावर एका 30 वर्षीय मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. टी-मालिका प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका 30 वर्षीय मुलीवर भुषण कुमार यांनी अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला असून. याप्रकरणी मुंबईतील डीएन नगर पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मात्र आत या संपुर्ण घटनेबाबत भूषण कुमार यांनी अधिकृतरीत्या स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.(Bhushan Kumar denies rape allegations) टी-सीरीज तर्फे जाहीर करण्यात आलं आहे की, महिलेने केलेले सर्व आरोप खोटे असून आम्ही कोणत्याही प्रकारे कामाचे आमिष त्या महिलेला दिलं नाहिये. तसेच रेकॉर्ड नुसार महिलेने आमच्या सोबत यापुर्वी एका म्युझीक व्हिडिओ आणि सिनेमात काम केलं आहे. 2021 मध्ये ती भूषण कुमार यांच्या जवळ एक वेब सीरीज प्रोड्यूस करण्यासाठी बातचीत करण्यासाठी आली होती. त्या वेळेस भूषण कुमार यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. तसेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात आल्या नंतर महिलेने आपल्या एका मित्रासोबत मिळून कंपनीकडून पैसे हाडपण्यासाठी अनेक प्रकारे प्लॅनिंग करत होती. टी-सीरीजने या संदर्भात मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनूसार, पीडीत महिलेतर्फे करण्यात आलेल्या आरोपामध्ये सांगितले आहे की,मुंबईतील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना घडली असून 2017 ते 2020 पर्यंत भूषण कुमार बलात्कार करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच पीडित तरुणीला तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याचे तिने सांगितले आहे.


हे हि वाचा – प्रेग्नंसीवरुन केलं ट्रोल, यूट्यूबर अभिनेत्री उर्मिलाने दिलं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -