घरमनोरंजनभूषण कुमार निर्मित ‘आत्मपँफ्लेट’ची ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

भूषण कुमार निर्मित ‘आत्मपँफ्लेट’ची ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

Subscribe

झी स्टुडिओज, आनंद एल. राय आणि भूषण कुमार या तीन दिग्गजांना एकत्र आणणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘आत्मपँफ्लेट’. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश मोकाशी यांनी केले असून नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या विस्तीर्ण यादीत झी स्टुडिओजने आणखी एका चित्रपटाची भर घातली आहे. ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जनरेशन १४ प्लस’ स्पर्धा प्रकारात या चित्रपटाची निवड झाली आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९) आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘वाळवी’ (२०२३) यांसारख्या चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन करणाऱ्या परेश मोकाशी यांनी ‘आत्मपँफ्लेट’चे लेखन केले आहे.

तेराव्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘वाळवी’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला असून ‘वाळवी’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. थ्रिलकॅाम हा नवीन जॅानर प्रेक्षकांच्या भेटीला आणल्यानंतर झी स्टुडिओज, परेश मोकाशी आणि आशिष बेंडे हे ‘वाळवी’चे त्रिकुट पुन्हा एकदा एक दर्जेदार आशय घेऊन सज्ज झाले आहे. ‘आत्मपँफ्लेट’ हा चित्रपट एका तरुण मुलाभोवती फिरणारा आहे, जो त्याच्या क्लासमेटच्या प्रेमात पडतो. ही एकतर्फी प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी आहे, जी त्याच्या भोवतालच्या नाट्यमय सामाजिक-राजकीय बदलांच्या पलीकडे जाणारी आहे. ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

- Advertisement -

झी स्टुडिओजचे सीबीओ शारिक पटेल म्हणाले, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘आत्मपँफ्लेट’ची निवड मराठी चित्रपट जागतिक स्तरावर सादर करेल. मराठी चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य स्टुडिओ आणि भागधारक या नात्याने स्थानिक कथाकथनाच्या सामर्थ्यावरचा आमचा विश्वास अधिक दृढ होतो. हा खास चित्रपट जागतिक स्तरावर कधी प्रदर्शित होणार, याची प्रचंड उत्सुकता लागली आहे.”

आयएफएफआर २०२३ मध्ये ‘जोरम’ची अधिकृत निवड, बर्लिनल मार्केट सिलेक्ट्स २०२३ मध्ये ‘ब्राऊन’ची निवड आणि शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘लॉस्ट’ प्रदर्शित झाल्यानंतर आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाल्यानंतर झी स्टुडिओज सातत्याने जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त होणारा आशय तयार करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

मिथुन चक्रवर्तींच्या फेक अकाऊंटला अमिताभ बच्चन करतायत फॉलो; ब्लू टिकचा गोंधळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -