
बॉलीवूड अभिनेता आणि भारताचा सर्वांत मोठा स्टार यूट्यूबर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुवनचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. भुवनला त्याच्या या यशासाठी आयुष्यातील अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले आहे. कोरोनाकाळात त्याने त्याच्या आई-वडिलांना गमावले. हा आयुष्यातील काळ भुवनसाठी फार कठीण होता. याशिवाय त्याला करिअरची सुरुवात करताना त्याला अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले, कारण त्याचे काम आणि करिअरसाठी निवडलेला विषय घरच्यांच्या पसंतीचा नव्हता. मात्र भुवनने मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या पायांवर उभा राहिला आणि स्वत:च्या बळावर त्याने आपले नाव कमावले आहे.अभिनेता भुवन बाम हा मुळचा गुजरातचा आहे. आज 22 जानेवारीला त्याचा वाढदिवस आहे. भुवन बाम हा एकेकाळी रेस्टॉरंटमध्ये गाणं गायचा तोच आज भारतातील पहिला स्टार यूट्यूबर म्हणून ओळखला जात आहे.
View this post on Instagram
आज भुवन बामचे YouTube वर 25.1 दशलक्ष सब्सक्राइबर्स आहेत आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळतात. अभिनेत्याने ‘बीबी की वाइन्स’ नावाने आपले चॅनल सुरू केले परंतु त्यामागे त्याचे कोणतेही विशेष नियोजन नव्हते. जेव्हा ते TEDx Talk दिल्ली IIT मध्ये होते, त्यावेळी त्याच्या मनात हा विचार आला होता. त्याने दररोज स्वत:चा वेगळा कंटेट प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या चॅनलवर अनेक व्हिडिओ बनवले आहेत .
View this post on Instagram
भुवनचे बनवलेल्या व्हिडिओने तरुणाईला वेड लावले आहे. भुवन बाम याने गायक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात एका रेस्टॉरंटमध्ये केली. त्याच्या आवडीला आणि करिअरला घरच्यांनी पांठिबा दिला नव्हता. कालांतराने यूट्युबवर त्याच्या व्हिडीओने धुमाकूळ घातला. त्याचे आज अनेक फॉलोवर्स आहेत. भुवनने सोशल मिडियाच्या आजादीचा पूर्णपणे फायदा उठवला. त्याच्या व्हिडिओमध्ये अपशब्दांचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो वादाच्या कचाट्यातही अडकला होता.
हेही वाचा – Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत अफवा, प्रकृती स्थिर