Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी बिग बींवर होते ९० कोटींचे कर्ज, पैसे मागण्यासाठी लोक घरी यायचे

बिग बींवर होते ९० कोटींचे कर्ज, पैसे मागण्यासाठी लोक घरी यायचे

अभिनय क्षेत्रात स्थिरावल्या नंतर अमिताभ बच्चन यांनी अभिनयासोबतच आपला व्यवसायही सुरु केला होता

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh bachchan ) यांना त्यांच्या घरात जाऊन पैसे मागितले आणि त्यांना शिवीगाळ केली जात होती असे चाहत्यांना सांगितले तर आश्चर्य वाटेल मात्र खुद्द अमिताभ बच्चन यांनीच याविषयीचा खुलासा केला आहे. ७० -८०च्या दशकात प्रेक्षकांनी बिग बींना डोक्यावर घेतले होते. अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी प्रेक्षकांना दिले. मात्र त्यांच्या या प्रवासात त्यांना अनेक कठीण प्रसगांना तोंड द्यावे लागले होते. बिग बींवर ऐन उमेदीच्या काळात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. बिग बींवर ९० कोटींचे कर्ज होते. या कर्जाचे पैसे मागण्यासाठी लोक माझ्या घरी येऊन दमदाटी करुन शिवीगाळ करत होते असे २०१३मध्ये एका मुलाखतीत बिग बी अमिताभ बच्चन यांनी याविषयीचा खुलासा केला होता. (Big B Amitabh bachchan had debt of Rs 90 crore, Creditors to come home for money)

अभिनय क्षेत्रात स्थिरावल्या नंतर अमिताभ बच्चन यांनी अभिनयासोबतच आपला व्यवसायही सुरु केला होता. ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड’ नावाची त्यांची कंपनी होती. ही कंपनी सिनेमांची निर्मिती, डिस्ट्रिब्यूशन आणि इवेंट मॅनजमेंटचे काम करत होती. मात्र १९९९ साली अमिताभ यांच्या कंपनीवर तब्बल ९० कोटी रुपयांचे कर्ज झाले. ९० कोटी रुपयांचे कर्ज फेडणे काही सोपे नव्हते. त्या काळात अनेक जण माझ्या घरी पैसे मागण्यासाठी यायचे,शिवीगाळ करायचे. मी तेव्हा शांत बसून राहायचो. माझ्या ४४ वर्षांच्या कारकिर्दीतील ते दिवस मी कधीच विसरु शकत नाही. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण काळ होता, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले होते.

- Advertisement -

मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी पुढे असे म्हटले होते की, मी दूरदर्शन आणि इतर अनेकांकडून पैसे घेतले होते. त्यांचे पैसे परत करताना त्यांनी माझ्याकडे पैशांवरील व्याज मागितले. तेव्हा मी त्यांच्या काही जाहिरातीत काम करुन त्याचे पैसे त्यांना दिले. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला तेव्हा मी यश चोप्रा यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी मला मोहब्बते सारख्या सिनेमांची ऑफर दिली होती.


हेही वाचा – दिलीप कुमार यांनी नवोदितांना प्रोत्साहन दिलं नाही- नसीरुद्दीन शहा

- Advertisement -

 

- Advertisement -