घरताज्या घडामोडीबिग बी अमिताभ बच्चन यांचे दाऊद इब्राहिमसोबत कनेक्शन? काय आहे व्हायरल फोटोमागचं...

बिग बी अमिताभ बच्चन यांचे दाऊद इब्राहिमसोबत कनेक्शन? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य

Subscribe

बिग बींचा दाऊद इब्राहिमसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर बिग बींचे देखील अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे म्हणत त्यांना ट्रोल करण्यात आले

नुकतीच ऐश्वर्या राय बच्चनची पनामा पेपर्स प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली. तर दुसरीकडे अभिनेत्री तसेच राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी संसदेत बॉलिवूड विषयी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर जया बच्चन यांना जबरदस्त ट्रोल करण्यात आले. त्यातच आता बिग बी अमिताभ बच्चन यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बिग बी एका व्यक्ती सोबत हात मिळवत त्यांच्याशी बोलताना दिसत आहेत. ती व्यक्ती दाऊद इम्राहिम असल्याचे म्हटले जाता आहे. खरंतर  याआधी देखील हा फोटो व्हायरल करुन बिग बींचे दाऊद सोबत कनेक्शन असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यावेळी अभिषेक बच्चन याने  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या फोटोचा खुलासा केला होता.

गेल्या वर्षी बिग बींचा दाऊद इब्राहिमसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर बिग बींचे देखील अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे म्हणत त्यांना ट्रोल करण्यात आले होते. या फोटोचा खुलासा करत अभिषेक बच्चनने म्हटले होते की, ‘भाऊ, हा फोटो माझे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक शंकरराव चव्हाण यांचा आहे’. अभिषेकच्या स्पष्टीकरणानंतर बिग बींसोबत फोटोमध्ये दाऊद इब्राहिम नसून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आहेत हे स्पष्ट झाले.

- Advertisement -

बिग बी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते सतत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असतात. कधी कधी त्यांना त्यांच्या पोस्टमुळेही ट्रोल केले जाते. बिग बी सध्या कौन बनेगा करोडपती १३ चे सुत्रसंचालन करत आहेत. नुकताच करोडपतीचे १ हजार एपिसोड्स पूर्ण झाले.

- Advertisement -

हेही वाचा – 10 Years of Don 2: डॉन २च्या शूटिंगवेळी शाहरुखने दाबला होता प्रियंकाचा गळा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -