Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन हेल्मेटशिवाय प्रवास केल्याने ट्रोल झालेल्या बिग बींनी मागितली माफी

हेल्मेटशिवाय प्रवास केल्याने ट्रोल झालेल्या बिग बींनी मागितली माफी

Subscribe

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वयाच्या 80 व्या वर्षीही चित्रपटांमध्ये खूप सक्रिय आहेत. या वयातही अमिताभ बच्चन अनेक चित्रपटांमध्ये काम करतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही तितकेच खूप सक्रिय असून आपल्या चाहत्यांशी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक नवनवीन अपडेट्स शेअर करतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका व्यक्तीसोबत बाईकवरुन शूटिंग सेटवर जात असतानाचा एक फोटो शेअर केला होता. मात्र, त्यानंतर अनेकांनी त्यांना हेल्मेट न घातल्यामुळे ट्रोल केलं होतं. शिवाय काहींनी त्याच्याबद्दल मुंबई पोलिस आणि मुंबई वाहतूक पोलिसांकडे तक्रारही केली होती.

या संपूर्ण प्रकरणानंतर अमिताभ यांना नेटकऱ्यांच्या टिकेला सामोर जावे लागत आहे. याप्रकरणी त्यांनी त्यांच्या रविवारच्या ब्लॉगमध्ये नोट लिहून स्पष्टीकरण दिले. अमिताभ म्हणाले, “रविवारचा दिवस आहे, बॅलार्ड इस्टेटच्या एका गल्लीत शूट करण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे. रविवारची परवानगी घेण्यात आली आहे, कारण त्या दिवशी सर्व कार्यालये बंद असतात आणि गर्दी नसते. पोलिसांच्या परवानगीनंतर, परिसरातील एक लेन शूटिंगसाठी बंद करण्यात आली आहे, जी सुमारे 30-40 मीटर लांब आहे. मी जे कपडे परिधान केले आहेत तो माझा कॉस्ट्यूम आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

“पण मला कुठेतरी वेळेवर पोहोचायचे असेल तर मी नक्कीच या गोष्टीचा अवलंब करेन आणि हेल्मेट घालेन आणि सर्व नियमांचे पालन करेन. असे करणारा मी एकटा नाही. अक्षय कुमारही शूटिंगच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी हे करतो. हेल्मेट घालतो. त्याच्या गार्डच्या बाईकवर बसतो. त्याला कोणी ओळखतही नाही. हे एक झटपट आणि सोपे काम आहे.” असं अमिताभ म्हणाले.

अमिताभने मागितली चाहत्यांची माफी

पुढे अमिताभ म्हणाले की, “माझ्याबद्दल काळजी दाखवल्याबद्दल आणि मला ट्रोल केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि ज्यांना वाटले की मी ट्रॅफिकचे नियम तोडले त्यांना सॉरी पण मी तसे काहीही केलेले नाही. माझे तुम्हा सर्वांवर प्रेम आहे.”

- Advertisement -

 


हेही वाचा :

PVR आणि INOX ची 50 चित्रपटगृह 6 महिन्यात होणार बंद… कंगनाने दिली प्रतिक्रिया

- Advertisment -