Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनAmitabh Bachchan : बिग बींनी जया बच्चन सोबतच्या पडद्यावरच्या केमिस्ट्रीबद्दल सांगितले

Amitabh Bachchan : बिग बींनी जया बच्चन सोबतच्या पडद्यावरच्या केमिस्ट्रीबद्दल सांगितले

Subscribe

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 16 या गेम शोमध्ये या आठवड्यात होस्ट अमिताभ बच्चन समोर असतील जयपूरचे HR व्यावसायिक विरेन्द्र शर्मा. श्री. बच्चन यांनी त्यांना विचारले, “माझ्या बाबतीत तुमचे काय मत आहे? मी स्वतःचा CV बनवला पाहिजे का?” यावर विरेन्द्र यांनी गंमतीत उत्तर दिले, “तुमचा CV इतका लांबलचक बनेल, त्यात काहीच कमी नसेल!” हसत हसत श्री. बच्चन म्हणाले, “माझ्या CV मध्ये एक गोष्ट नक्कीच असेल, “काम दे दो भैय्या!” या हलक्या फुलक्या गप्पा मारता मारता विरेन्द्र यांनी आपल्या कारकिर्दीविषयी, आपल्या आकांक्षा, यश आणि चिकाटी याविषयी सांगितले.

या खेळादरम्यान विरेन्द्र यांनी अमिताभ बच्चन यांचा ‘अभिमान’ चित्रपट आपल्या आवडीचा असल्याचे शेअर केले. या चित्रपटाचे संगीत आपल्याला खूप आवडते हे कबूल करत त्यांनी श्री. बच्चन यांना जया बच्चन सोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव कसा होता हे विचारले. मंद हास्य करत श्री. बच्चन यांनी या चित्रपटामागची कहाणी सांगितली.

- Advertisement -

“संगीत तर अप्रतिमच होते. आणि हृषीकेश मुखर्जी सोबत काम करण्याची संधी होती. त्यावेळी माझे जयाशी लग्न झाले नव्हते. चित्रपटाचे कथानक आणि संगीत सुंदर होते. कधी कधी संगीतकार आणि मी एकत्र बसायचो, गाणी ऐकायचो आणि चित्रपटातील परिस्थितीस अनुकूल नवी गाणी रचली जायची. ते वातावरणच काही वेगळे होते.

लताजी नेहमी विचारायच्या, ‘हे गाणे तयार झाले आहे का आणि ते कोण गाणार आहे? त्या ते गाणे अशा प्रकारे म्हणायच्या की त्यातून त्या क्षणाची आणि गायकाची भावना अचूक व्यक्त व्हायची. लताजींचा हा गुण अद्वितीय आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Dhanush and Aishwaryaa : धनुष आणि ऐश्वर्याचा लग्नाच्या 18 वर्षानंतर घटस्फोट


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -