Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कृति सेननच्या फोटोवर बिग बींची कमेंट, ट्रोलर्सने साधला निशाणा

कृति सेननच्या फोटोवर बिग बींची कमेंट, ट्रोलर्सने साधला निशाणा

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन नेहमीच चर्चेत असते. तिच्या हटके बोल्ड फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत असते. मात्र कृतीचा बोल्ड अंदाज खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांना चांगलाच महागात पडला आहे. कृतिच्या फोटोंवर तिचे चाहते नेहमीच फिदा असतात. त्यामुळे बिग बींनाही तिच कौतुक केल्याशिवाय राहवलं नसणार. मात्र बिग बींनी कृतिचं केलेलं कौतुक काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं दिसत नाही. ट्रोलर्सनी बिग बींवर चांगलाच निशाणा साधला आहे.  नुकताच कृतिने तिच्या सोशल मीडियावर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला. त्यावर बिग बी अमिताभ बच्चन यांनी वॉव(WOW)अशी कमेंट करत क्रितीचे कौतुक केले. मात्र नेटकऱ्यांनी ‘दीदी तेरा दादु दिवाना’ असे म्हणत बिग बींची चांगलीच खिल्ली उडवली आहे. सध्या बिग बींच्या या ट्रोलिंगची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

कृतिच्या फोटोला तर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मात्र बिग बींच्या कमेंटवरही जवळपास २० हजारांहून अधिक लोकांनी रिप्लाय दिला आहे. बिग बी हल्ली सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेक गोष्टी ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मात्र त्यामुळे त्यांना बऱ्याचदा ट्रोलही व्हावे लागते. दीदी तेरा दादू दिवाना असे म्हणत नेटकऱ्यांनी बिग बींना ट्रोल केले आहे. काही नेटकऱ्यांनी असेही म्हटले आहे, बच्चन साहब मौज हे, जया रेखा कृति सेनन के खोज मे, त्याचप्रमाणे ‘दीदी दादू के भावनाओ मे आपके लिये सन्मान हे’ अशा कमेंटही केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

- Advertisement -

अभिनेत्री कृति सेनन लवकरच आदिपुरुष या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता प्रभाससोबत कृति दिसणार आहे. तर बिग बी अमिताभ बच्चन लवकरच चेहरे या सिनेमातून दिसणार आहे. बिग बी आणि अभिनेता हिमरान हाश्मी पहिल्यांदा या सिनेमातून एकत्र काम करणार आहेत.


हेही वाचा – Filmfare Awards 2021 : थप्पड ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, अभिनेता इरफान खानचा मरणोत्तर सन्मान
- Advertisement -

 

- Advertisement -