घरमनोरंजन'बिग बॉस मराठी २'चे 'हे' आहेत संभाव्य स्पर्धक!

‘बिग बॉस मराठी २’चे ‘हे’ आहेत संभाव्य स्पर्धक!

Subscribe

या स्पर्धेत कोण कलाकार दिसणार याचे अंदाज बांधले जात आहेत. स्पर्धकाची नावं ही असू शकतात. यावर अद्याप शिकमोर्तब झालेलं नाही.

१९ मे पासून बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन सुरू होत आहे. या पर्वात कोण कोण दिसणार याची चर्चा सध्या नाक्या नाक्यावर सुरू आहे. या स्पर्धेत कोण कलाकार दिसणार याचे अंदाज बांधले जात आहेत. याची यादी सोशलमिडीयावर व्हायरल झाली आहे.

 ‘कलर्स मराठी’च्या ट्विटर अकाऊंटवर गेल्या काही दिवसांत कोण कलाकार सहभागी होणार याविषयी प्रोमो प्रदर्शित करण्यात आले होते. परंतु, नावांची अधिकृत घोषणा मात्र अद्याप करण्यात आली नाही. परंतु, आता काही कलाकारांच्या नावांची जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्ये लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेता मिलिंद शिंदे,अभिनेत्री रसिका सुनील, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी चितळे, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे, नाट्यकर्मी दिगंबर नाईक, टिकटॉक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता देशमुख अशा काही नावांचा समावेश आहे. परंतु, या नावांवर अद्याप ‘बिग बॉस’ मराठीच्या टीमकडून शिक्कामोर्तब झालेलं नाही.

- Advertisement -

 लवकरच कलर्स मराठीकडून अधिकृत नावांची घोषणा करण्यात येईल. १७ मे पासून या सिझनच्या शुटींगला सुरूवात होईल. पहिला एपिसोड १९ मेला टेलिकास्ट करण्य़ात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -