घरमनोरंजननंदकिशोर यांचा खरा चेहरा येणार प्रेक्षकांसमोर

नंदकिशोर यांचा खरा चेहरा येणार प्रेक्षकांसमोर

Subscribe

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालही रंगला “मिशने ए कुशन” हा टास्क. ज्यामध्ये सई आणि रेशमच्या टीमने एकमेकांचे पैसे चोरण्यासाठी बऱ्याच युक्त्या केल्या. रेशम आणि टीमने सईचे पैसे चोरल्याचे काल त्यांना कळालं नाही, परंतु सईने स्मिताचे पैसे चोरले हे मात्र स्मिताला कळालं.

big boss 3
(फोटो सौजन्य : कलर्स मराठी)

नंदकिशोर आणि उषामध्ये वाद रंगला

काल नंदकिशोर, भूषण, त्यागराज आणि उषा नाडकर्णी यांच्यामध्ये बराच वेळ संभाषण रंगलं आणि नंतर त्याचे रुपांतर वादामध्ये झालं. आज देखील पुष्कर आणि नंदकिशोर मध्ये चांगलेचं भांडण बघायला मिळणार आहे.
नंदकिशोर चौघुले यांना असलेला अति आत्मविश्वास आता हळूहळू कॅमेरासमोर येत आहे. पन्नास दिवसानंतर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेल्या नंदकिशोर यांनी सगळ्या सदस्यांबद्दल बरीच माहिती घेऊन आल्याचा दावा तर केला आहे पण, त्यांची ही वागणूक घरामध्ये आणि घराबाहेर त्यांच्या बाजूने जाणार कि त्यांच्याविरोधात ? हे तर येणारी वेळेच सांगेल. आजदेखील नंदकिशोर आणि पुष्कर तसेच नंदकिशोर आणि मेघा, शर्मिष्ठा आणि सई मध्ये बराच वाद होणार आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -