Big Boss Marathi: आंदोलनानंतर इंदुरीकर महाराजांची 80% किर्तने झाली डिलीट… तृप्ती देसाईने केला खुलासा

big boss marathi trupti desai speak about indurikar maharaj
Big Boss Marathi: आंदोलनानंतर इंदुरीकर महाराजांची 80% किर्तने झाली डिलीट... तृप्ती देसाईने केला खुलासा

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या(big boss marathi 3) सिझनला धमाकेदार सुरुवात झाली असून स्पर्धकांनी घरामध्ये एंण्ट्री करताच  तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात कलाकारांसह किर्तनकार आणि राजकारणी मंडळींचाही समावेश पाहायला मिळत आहे. सामाजिक कार्यकर्त्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई (trupti desai)यांनी बिग बॉसच्या घरामधे भाग घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या तसेच यंदाचा सिझन तृप्ती देसाई गाजवणार का असा सवाल नेटकरी करत आहेत. दरम्यान तृप्ती देसाई यांनी पहिल्याच भागामध्ये किर्तनकार इंदुरीकर महाराजांशी संबधीत वक्तव्य केले आहे.(big boss marathi trupti desai speak about indurikar maharaj)

बिग बॉसच्या घरामध्ये तृप्ती देसाई, किर्तनकार शिवलीला पाटील , मीनल शाह, सुरेखा कुडाची गप्पांचा फड रंगला असताना त्या इंदुरीकर महाराजांविषयी बोलायला लागल्या. शिवलीला म्हणाल्या, ” मी असं म्हटल की या तृप्ती ताई देसाई आहेत. यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात केस केली होती ” असे बोलत शिवलीला यांनी मी पुराव्यांच्या आधारेच किर्तन करते असे सांगितले.

शिवलीला यांचे बोलणे झाल्यावर तृप्ती देसाई म्हणाल्या , इंदुरीकर महाराजांची बरीचशी किर्तने महिलांच्या विरोधात असताता त्यांचा अपमान करणारी असताता, आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांनी अनेक किर्तने यूट्यूबवरुन डिलिट केली. म्हणजे जवळपास त्यांनी 80 टक्के किर्तने टिलीट केली आहेत. यानंतर शिवलीला म्हणाल्या बऱ्याच किर्तनकारांनी डिलिट केली आहेत. त्यावर तृप्ती देसाई यांनी प्रतिउत्तर देत बोलल्या, “हो कराण मी तेव्हा मोहीमच चालवली होती त्यावेळी संपूर्ण जिल्हा माझ्या विरोधात होता. मी जाणार म्हटल्यावर 100 किलो मीटर आधीच मला पोलिसांनी ताब्यात घेतले.”

तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या महिलांनी फेटा घालू नये असे इंदुरीकर महाराज म्हणाले होते, “महिलांनी फेटा घातला तर आम्ही काय गाऊन घालायचं का?” त्यांनी केलेलं हे विधान चुकीचे होते. शिवलीला देखील किर्तनाचे अनेक कार्यक्रम करताना फेटा घालतात, अनेक ठिकाणी फेटा घातला जातो त्यात गैर काय असं देखील तृप्ती देसाई म्हणाल्या.


हे हि वाचा – Big Boss Marathi 3: म्हणूनच किर्तनकार ‘शिवलीला’, आईनेच सांगितला नावाचा किस्सा