बिग बींच्या हेअरस्टाईलची परदेशात भुरळ

या फोटोखाली त्यांनी लिहिलं की, "कोणीतरी पॅरिसमध्ये होतं, त्याच्याकडून हे सरप्राईज आलं आहे. त्याने हे सलून पाहिलं, ज्यामध्ये माझा फोटो होता. अरे देवा, या जगाला नक्की काय झालं आहे."

करिअरमध्ये एका पेक्षा एक चित्रपट दिले आहेत. ज्यात त्यांनी प्रत्येक चित्रपटाला आपल्या अभिनयाने चारचाँद लावले आहेत. त्यामुळे गेले ५ दशक त्यांच्या अभिनयासोबतच लोक त्यांची स्टाईल देखील कॉपी करू पाहतात. बॉलिवूडचे हे महानायक वयाबरोबरच आपल्या तब्बेतीकडे सुद्धा व्यस्थित लक्ष देतात. जगभरात त्यांच्या अभिनाचे आणि स्टाईलचे आजही करोडो चाहते आहेत.

अमिताभ यांनी शेअर केला पॅरिस सलून बाहेरचा फोटो
नुकतीच एक खास पोस्ट अमिताभ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. या फोटोखाली त्यांनी लिहिलं की, “कोणीतरी पॅरिसमध्ये होतं, त्याच्याकडून हे सरप्राईज आलं आहे. त्याने हे सलून पाहिलं, ज्यामध्ये माझा फोटो होता. अरे देवा, या जगाला नक्की काय झालं आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

दरम्यान, अमिताभ यांच्या फोटो शिवाय तिथे एका परदेशी अभिनेत्रीचा देखील फोटो लावला आहे. तर एक ऑस्ट्रेलियन अभिनेत्री सुद्धा यात दिसून येत आहे.

या चित्रपटांमध्ये दिसणार अमिताभ
अमिताभ बच्चन यांचा ९ सप्टेंबर रोजी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत आलिया आणि रणबीर कपूर सुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय ते दीपिका आणि प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट k’ मध्ये सुद्धा दिसणार आहेत.सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे.तसेच अमिताभ रश्मिका मंदानासोबत ‘गुडबाय’ चित्रपटामध्ये सुद्धा झळकणार आहेत.


हेही वाचा :‘हर घर तिरंगा’ अभियानाचं नवं गाणं; आशा भोसले, सोनू निगम, अमिताभ बच्चन यांचा स्वरसाज