घरमनोरंजन32000 नसून 3 महिलांची गोष्ट... 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या कथेत होणार मोठा बदल

32000 नसून 3 महिलांची गोष्ट… ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या कथेत होणार मोठा बदल

Subscribe

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाल्यानंतर वादाला सुरूवात झाली आहे. ट्रेलर संदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही महिलांचे धर्मांतर खोटं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकजण या चित्रपटावर टीका करत आहेत. अशातच, आता या चित्रपटाच्या कथेत मोठा बदल करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 32000 मुली बेपत्ता झाल्याचा उल्लेख करण्यात आला. अशातच आता नव्या टीझरच्या डिस्क्रिप्शनमध्ये निर्मात्यांनी बदल केला आहे. ज्यात 32000 मुलींच्या ऐवजी नव्या टीझरच्या डिस्क्रिप्शनमध्ये 3 महिलांचा ब्रेनवॉश करुन त्यांचे धर्मांतर करुन भारत आणि परदेशातील दहशतवादी मोहिमांवर पाठवण्यात आले होते, असं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

- Advertisement -

सेन्सॉर बोर्डाने ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील 10 सीन्स काढण्याचे आदेश दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ए सर्टिफिटेट देखील दिलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेनने केलं असून विपुल अमृतलालने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला झाले 43 वर्ष; पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -