घरमनोरंजनश्रद्धा कपूर लवकरच विवाहबंधनात !

श्रद्धा कपूर लवकरच विवाहबंधनात !

Subscribe

श्रद्धा कपूर आणि रोहित श्रेष्ठ यांच्या नात्याबद्दल सोशल मिडियावर चर्चा सुरु.

चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते विवाहबंधनात अडकले आहेत. त्याचबरोबर आता कपूर घराण्यातही सनईचौघडे वाजण्याची शक्यता आहे. बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर विवाहबंधनात अडकण्याचे वृत्त समोर आले आहे. श्रद्धा कपूर ही रोहन श्रेष्ठला डेट करत आहे. पण दोघांनी एकमेकांच्या नात्या बद्दल काही सांगितले नाही. पण दोघे एकमेकांचे चांगले मित्र असून एकमेकांसोबत त्यांनी बराच वेळ घालवला आहे. श्रद्धा कपूर आणि रोहित श्रेष्ठ त्यांच्या नात्याबद्दल बोलत नसले तरी, काही दिवसांपासून लग्नाची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. यातच आता रोहन श्रेष्ठच्या वडिलांनी श्रद्धा कपूर आणि रोहित श्रेष्ठ यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना हिंट दिली आहे.

दरम्यान, एका वृत्तानुसार रोहनचे वडील राकेश श्रेष्ठ यांनी रोहन आणि श्रद्धा खूप जुने मित्र आहेत. महाविद्यालयीन काळापासून हे दोघे एकमेकांसोबत आहेत. श्रद्धाचे बरेच मित्र आहेत. श्रद्धाशिवाय जुहूमध्ये माझ्या मुलाचा दुसरा कोणी मित्र किंवा मैत्रीण नाही. दोघेही आपल्या व्यावसायिक आयुष्यात चांगले काम करत आहेत. दोघांनाही एकमेकांची सोबत आवडत असेल आणि एकत्र राहायचे असेल तर चांगलीच गोष्ट आहे. याशिवाय दोघांनाही लग्न करायचं असेल, तर मी त्यांच्यासाठी सर्व काही आनंदाने करण्यास तयार आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी चाहत्यांना हिंट दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – pooja chavan suicide- मी फक्त तिला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप, मोबाईलबद्दल माहित नाही – भाजप नगरसेवक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -